Hindu Deportation Demand : देशातील 8 लाख हिंदूंना बाहेर काढा! ‘या’ देशात संसदेच्या निवडणुकीनंतर हिंदू टार्गेटवर

Khalistani Movement in Canada : कॅनडातील 8 लाख हिंदूंना बाहरे काढून परत भारतात पाठविण्याची मागणी खलिस्नानवाद्यांनी केली आहे.
Protesters in Canada advocating for the deportation of 800,000 Hindus, highlighting rising tensions fueled by Khalistani supporters.
Protesters in Canada advocating for the deportation of 800,000 Hindus, highlighting rising tensions fueled by Khalistani supporters. Sarkarnama
Published on
Updated on

Impact on Indo-Canadian Relations : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचलेला असतानाच कॅनडातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये संसदेची निवडणूक पार पडली असून मार्क कार्नी हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत खलिस्तानी समर्थक बडा नेताही पराभूत झाला आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडातील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

कॅनडातील 8 लाख हिंदूंना बाहरे काढून परत भारतात पाठविण्याची मागणी खलिस्नानवाद्यांनी केली आहे. कॅनडातील टोरांटो येथील माल्टन गुरुद्वारामध्ये हिंदू विरोधी रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खलिस्तानी समर्थकांनी हिंदूंना भारतात परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Protesters in Canada advocating for the deportation of 800,000 Hindus, highlighting rising tensions fueled by Khalistani supporters.
Water sharing dispute : ‘पाक’च्या तोंडचं पाणी पळण्याआधी भारतातच सीमेवरील राज्यांमध्ये पेटला वाद; केंद्रासमोर आव्हान...

रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे पिंजऱ्यात बंद करण्यात आलेले पुतळेही होते. मात्र, कॅनडामध्येच या रॅलीवरून रोष व्यक्त केला जात आहे. येथील पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी रविवारी हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले की, आपल्या रस्त्यांवर जिहादी लोक उन्माद करत आहेत. ख्रिश्चन समाजाल धमकावत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत.

मार्क कार्नी यांचा कॅनडा जस्टिन ट्रूडो यांच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का?, असा सवाल बोर्डमन यांनी केला आहे. त्यांच्या पोस्टनंतर शॉन बिंदा नावाच्या एका यूझरनेही या रॅलीवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माल्टर गुरूद्वारामध्ये के-गँगने 8 लाख हिंदूंना भारतात पाठविण्याची मागणी केली आहे. त्रिनिनाद, गयाना, सूरीनामा, जमैका, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, केनिया आणि इतर अनेक ठिकाणी हा समुदाय आहे.

Protesters in Canada advocating for the deportation of 800,000 Hindus, highlighting rising tensions fueled by Khalistani supporters.
Terror Attack Alert : हायप्रोफाईल दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी जेलवर हल्ल्याची तयारी? सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

हा भारत सरकारचा विरोध नव्हे तर खलिस्तान दहशतवाद्यांच्या समुहाचा हिंदूविरोधी द्वेष आहे. हा समूह 1985 मधील एअर इंडियाच्या बॉम्बस्फोटासारख्या कॅनडातील सर्वात घातक हल्ल्यांसाठी कुख्यात आहे. तरीही उघडपणे द्वेष पसरवत आहेत, असे म्हणत बिंदा यांनी या रॅलीतील लोकांना खलिस्तानी दहशतवादी म्हटले आहे. दरम्यान, कॅनडामध्ये यापूर्वी अनेकदा हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. तसेच ट्रुडो यांच्या काळात दोन्ही देशांतील संबंध खलिस्तान्यांना दिलेल्या आश्रयावरून अधिक ताणले गेले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com