Disha Salian Death Case latest news : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सीबीआयने अहवाल दिला आहे. यात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा भाजपचा आरोप चुकीचा असल्याचे सीबीआयने आपल्या चौकशी अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे सीबीआयने भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. (Disha Salian Death Case latest news)
दिशा सालियान हीचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता, ही आत्महत्या की हत्या असा, असा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर सीबीआय तपास करीत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय या निष्कर्षावर पोहोचली आहे. 'दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे,' असा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.
दिशाच्या मृत्यूनंतर भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचा मुलगा नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे अनेक गंभीर आरोप केले होते. सीबीआयने आज दिलेल्या अहवालामुळे राणे पिता-पुत्राचे आरोप खोडून काढले आहेत. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
दिशाच्या कुटुंबियांनी या प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन नाराजी व्यक्त केली होती. "विनाकारण दिशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदनामी होत राहिली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जीवाचं बरंवाईट केलं तर त्यासाठी नेते जबाबदार असतील. मी आता हात जोडून विनंती करते की, कुणालाही बदनाम करु नका," असे दिशाच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.