Census 2027: जनगणनेच्या तारखा जाहीर! घरोघरी होणार नोंदणी; निवडणूक असलेल्या राज्यांना तूर्तास सूट, कोणते प्रश्न विचारणार?

Census Schedule 2027: जनगणना 2027 चे वेळापत्रक जाहीर! 25 जानेवारीपासून घरोघरी नोंदणी, 10 जानेवारीपासून स्वगणनेची सुविधा; निवडणूक असलेल्या राज्यांना तूर्तास सूट.
Census Schedule 2027:
Census Schedule 2027:Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Census January 25 2027: देशातील आगामी जनगणनेच्या प्रक्रियेचे वेळापत्रक केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 2027 मध्ये होणाऱ्या या जनगणनेसाठी नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

त्यानंतर सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन लोकसंख्येची माहिती संकलित करतील. ही प्रक्रिया 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे. मात्र, निवडणुका होणारी काही राज्ये आणि हिमवृष्टीचा परिणाम होणाऱ्या भागांना सध्याच्या वेळापत्रकातून वगळण्यात आले आहे.

देशाचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी शुक्रवारी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार, देशातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निश्चित केलेल्या कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेसाठी 1 मार्च 2027 ही संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली असून, त्या दिवशी रात्री 12 वाजताची स्थिती ग्राह्य धरली जाणार आहे.

उत्तर प्रदेशसह सात राज्ये, प्रदेशांना सध्या वगळले

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांना जनगणनेच्या पहिल्या वेळापत्रकातून वगळण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा पुढील आदेश येईपर्यंत या प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला नाही. लडाख, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमधील हिमवृष्टीने प्रभावित होणाऱ्या भागांनाही सध्याच्या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. या भागांमधील जनगणनेबाबत पुढील निर्णय स्वतंत्रपणे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Census Schedule 2027:
FDA Action: मसाल्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना FDAचा दणका! 19.7 कोटींचा माल जप्त, 84 परवाने निलंबित; 'या' शहरात सर्वाधिक कारवाई

स्वतःची माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत

जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांना स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या काळात नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची आवश्यक माहिती स्वतः नोंदवता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचारी घरी येण्यापूर्वीच माहिती भरण्याची संधी मिळेल.

स्व-गणनेची मुदत संपल्यानंतर 25 जानेवारीपासून प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात होईल. यामध्ये नियुक्त कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती गोळा करतील. 28 फेब्रुवारीपर्यंत ही मुख्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Census Schedule 2027:
Nashik Education Scam: शालार्थ आयडी, बोगस भरतीमुळे पगार-पेन्शनच्या फायली अडकल्या; कोणते अधिकारी रडारवर?

मार्चमध्ये होणार माहितीची पडताळणी

मुख्य जनगणना प्रक्रिया संपल्यानंतरही काही दिवस पुनरीक्षणाचे काम सुरू राहणार आहे. 1 मार्च ते 5 मार्च 2027 या कालावधीत जनगणनेच्या नोंदींचे पुनरीक्षण केले जाईल. या टप्प्यात संकलित माहितीची तपासणी आणि आवश्यक दुरुस्त्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, जनगणना ही देशाच्या लोकसंख्येची स्थिती, सामाजिक रचना आणि विविध प्रशासकीय नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार पुढील तयारीला वेग येणार आहे. निवडणूक आणि हवामानामुळे वगळलेल्या भागांसाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर होण्याकडे आता लक्ष लागले आहे.

Census Schedule 2027:
ZP Headmasters: झेडपी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर! सुटीत काम केल्यास दरवर्षी मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा; पण एक अट!

जनगणना 2027 : कोणते प्रश्न विचारले जाणार?

जनगणनेदरम्यान नागरिकांकडून वैयक्तिक माहिती, कुटुंब, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि इतर विविध विषयांशी संबंधित माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे

1. व्यक्तीचे नाव

2. कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते

3. लिंग (पुरुष/महिला/इतर)

4. जन्मतारीख आणि वय

5. सध्याची वैवाहिक स्थिती

6. विवाहाच्या वेळी असलेले वय

7. पती किंवा पत्नीचे नाव

8. राष्ट्रीयत्व

9. धर्म

10. अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) संदर्भातील माहिती

11. वडिलांचे नाव आणि माहिती

12. आईचे नाव आणि माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.