FDA Action: मसाल्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना FDAचा दणका! 19.7 कोटींचा माल जप्त, 84 परवाने निलंबित; 'या' शहरात सर्वाधिक कारवाई

FDA Raid Maharashtra: महाराष्ट्रात भेसळयुक्त आणि असुरक्षित मसाल्यांविरोधात FDAने मोठी कारवाई केली आहे. सहा महिन्यांत 19.7 कोटींचा मसाला साठा जप्त करण्यात आला असून 84 अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDA Raid Maharashtra
FDA Raid MaharashtraSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: सणासुदीच्या काळात बाजारात मसाल्यांची मागणी वाढलेली असताना महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त आणि असुरक्षित मसाल्यांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. 1 एप्रिल ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभरातून सुमारे 19.70 कोटी रुपये किमतीचा मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत व्यवसाय केल्याप्रकरणी 84 अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर आहे.

सात दिवसांत 13.60 कोटींचा साठा जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDAने विशेष तपासणी मोहीम राबवली. 23 ते 29 ऑक्टोबर या अवघ्या सात दिवसांत 1,057 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 13.60 कोटी रुपये किमतीचा मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 72 परवाने निलंबित करण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक कारवाई

राज्यातील सातही विभागांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे सुमारे 6.43 कोटी रुपयांचा मसाला साठा जप्त झाला. पुणे विभागात 3.99 कोटी रुपये, तर कोकण विभागात 3.19 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. परवाने निलंबित करण्याच्या बाबतीतही छत्रपती संभाजीनगर विभाग पहिल्या क्रमांकावर असून, तेथे 27 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDA Raid Maharashtra
Nashik Education Scam: शालार्थ आयडी, बोगस भरतीमुळे पगार-पेन्शनच्या फायली अडकल्या; कोणते अधिकारी रडारवर?

1,616 नमुने तपासणीसाठी; अनेक अहवाल प्रतीक्षेत

FDAने तपासणीदरम्यान मसाल्यांचे 11,963.87 क्विंटल इतके वजन असलेला साठा जप्त केला. तसेच प्रयोगशाळेतील तपासणीसाठी 1,616 नमुने गोळा करण्यात आले. यापैकी नऊ नमुने निकृष्ट दर्जाचे, सहा नमुने खाण्यास असुरक्षित, तर 18 नमुने चुकीच्या लेबलिंगचे आढळले. उर्वरित 1,053 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

FDA Raid Maharashtra
ZP Headmasters: झेडपी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर! सुटीत काम केल्यास दरवर्षी मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा; पण एक अट!

खुले मसाले विकण्यावर बंदी

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने मसाल्यांच्या विक्रीसंदर्भात कठोर उपाययोजना केल्या आहेत. खाद्य व्यावसायिकांना कच्च्या मालाची संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खुले मसाले विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

FDA Raid Maharashtra
ZP Headmasters: झेडपी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर! सुटीत काम केल्यास दरवर्षी मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा; पण एक अट!

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्यात आली. याशिवाय एका प्रकरणात न्यायालयीन कारवाई सुरू झाली, तर चार प्रकरणांचा दंड आकारून निपटारा करण्यात आला. आतापर्यंत 1.47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

FDAने ग्राहकांना उघड्यावर विकले जाणारे किंवा लेबल नसलेले मसाले खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मसाल्यांच्या पाकिटावरील बॅच क्रमांक आणि 'बेस्ट बिफोर' तारीख तपासावी. संशयास्पद उत्पादन आढळल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.