8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारवाढ लांबणीवर जाण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

8th Pay Commission salary revision delay reason : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठे अपडेट! 8व्या वेतन आयोगामुळे पगारवाढ लांबणीवर जाण्याची शक्यता का आहे? जाणून घ्या कारण आणि ताज्या घडामोडी.
8th Pay Commission
8th Pay CommissionSarkarnama
Published on
Updated on

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग हा विषय चर्चेचा ठरत आहे. या संदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पगारवाढ आणि पेन्शनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असली, तरी प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे आयोगाचा अहवाल कधी येणार आणि नवीन वेतन कधीपासून लागू होणार, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अहवालाबाबत केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार, आयोगाला स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत. 8th Central Pay Commission ची स्थापना 3 November 2025 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे आयोगाच्या अहवालासाठी सध्याची अंतिम मुदत साधारणपणे May 2027 पर्यंत जाते. त्यामुळे अजून काही काळ पगारवाढीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

8th Pay Commission
EPS-95 Pension Update: किमान पेन्शन 7 हजार 500 रुपये होणार? सरकारने लोकसभेत काय सांगितलं?

विशेष म्हणजे, आयोग May 2027 पूर्वी अहवाल सादर करणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीची निश्चित तारीख मिळालेली नाही. हीच बाब सध्या पगारवाढ लांबणीवर जाण्याचे प्रमुख कारण मानली जात आहे.

दरम्यान, फिटमेंट फॅक्टर किती असेल, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल किंवा पेन्शनमध्ये किती बदल होणार, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही. त्यामुळे 8th Pay Commission Salary Hike बाबत सध्या समोर येणारे अंदाज हे अधिकृत निर्णय मानता येणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com