Babri Masjid : चंद्रकांतदादा नीट माहिती घ्या; बाबरी पाडायला शिवसैनिकच होते; 'यूपी'तील शिवसेना नेत्याचा दावा

Pavan Pande on Chandrakant Patil : राजकारणासाठी बाबरी सुरक्षीत राहण्यासाठीच भाजपचे प्रयत्न
Pawan Pandey
Pawan PandeySarkarnama

BJP vs Thackeray Group : बाबरी मस्जिद पाडली त्यामध्ये शिवसेना नव्हती. शिवसेनेचा त्यामध्ये कोणताही हात नव्हता, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राज्यामधील अनेक नेत्यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. आता उत्तर प्रदेशातील ठाकरे गटाचे नेते माजी आमदार पवन पांडे यांनीही चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.

पवन पांडे (Pawan Pandey) म्हणाले की, "भाजप नेते चंद्रकंत पाटील यांचे बाबरीबद्दलचे वक्तव्य मला टीव्हीच्या माध्यमातून समजले. मी पाटील यांना आणि इतरांना सांगू इच्छितो की, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की आम्ही प्रतिकात्मक कारसेवा करणार नाही. भाजपनेही तेव्हा असाच प्रयत्न केला की ही बाबरी मस्जिद सुरक्षित रहावी. त्यामुळे त्यावर त्यांची राजकीय पोळी भाजू शकले असते. स्वर्गीय रामचंद्र परमहंस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे तेथे पाच हजार शिवसैनिक आले होते. त्यांनी सर्व बॅरिकेट तोडून आतमध्ये शिरून बाबही मस्जिद पाडली. तसे आदेश देणारे बाळासाहेब एकमेव नेते होते."

Pawan Pandey
Sanjay Shirsat On Babri : बाबरी पाडायला गेले ते सगळे कारसेवक, त्यांना पक्षाच्या चौकटीत आणू नका..

पांडे यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्याचीही आठवण यावेळी करून दिली. पांडे म्हणाले, "बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जर शिवसैनिकांनी ती बाबरी पाडली असेल तर मला त्याचा गर्व आहे. त्यानंतर बाबरीप्रकरणी खटला चालला त्यातही मुख्य आरोपी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव होते. त्यांच्यानंतर पवन कुमार पांडे हे नाव होते."

Pawan Pandey
Pune News : शिवतारेंच्या आग्रहाला भाजप नेता घालणार लगाम; घेणार कोर्टात धाव

पांडे यांनी घटनेनंतर भाजपने घेतलेल्या भूमिकेबद्दलही विधान केले. पांडे म्हणाले, "बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले की आम्ही तो ढाचा पाडला नाही. या उलट शिवसैनिकांनी सांगितले होते तो ढाचा आम्हीच पाडला. त्या खटल्यात नंतर सर्व लोकांना निर्दोष सोडले. त्यात सतीश प्रधान, मी (पवन पांडे), संतोष दुबे असे अनेक जे शिवसेनेचे पदाधिकारी होते. आता आम्हाला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. ती योजना आधीपासून तयार होती."

बाबरी मस्जिद पाडण्याची सर्व वस्तूस्थिती वेगळी आहे. त्याबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही पांडे यावेळी म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com