Pune News : शिवतारेंच्या आग्रहाला भाजप नेता घालणार लगाम; घेणार कोर्टात धाव

Ujjwal Keskar : दोन महापालिकेचा लवकर विचार करण्याचेही आवाहन
Vijay Shivtare, Ujjwal Keskar
Vijay Shivtare, Ujjwal KeskarSarkarnama
Published on
Updated on

PMC News : पुणे महानगरपालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्या गावातील पुर्वेकडील फुरसुंगी आणि दक्षिण पूर्वेकडील उरळी देवाची ही गावे ३१ मार्च २०२३ रोजी वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही गावांची मिळून नगरपरिषद करणार असल्याचेही सरकाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयला आता विरोध होऊ लागला आहेत. भाजपचे नेते, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात केसकर यांनी आपली बाजू मांडली आहे.

Vijay Shivtare, Ujjwal Keskar
Hasan Mushrif News : राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार; उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

माजी नगरसेवक केसकर यांनी हा निर्णय एका माजी मंत्र्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतल्यचा आरोप करून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळली आहेत. राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय राजकीय आहे. एका माजी मंत्र्याच्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा विरोध आहे. "

Vijay Shivtare, Ujjwal Keskar
BJP News : `राष्ट्रवादी`चा राष्ट्रीय दर्जा गेल्याने भाजपला काहीच लाभ, हानी नाही!

फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांची मिळून नगरपरिषद होणार आहे. मात्र त्या नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा स्त्रोताबाबत काहीच योजना तयार केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. केसरकर म्हणाले, "या गावांची मिळून नगरपरिषद करायची असेल तर त्या गावांसाठी आर्थिक स्त्रोत काय राहतील? ती गावे आपल्या पायावर कशी उभी राहतील? याबाबत राज्य सरकारने स्पष्ट आराखडा द्यायला हवा होता, तो दिलेला नाही."

महापालिकेतून वगळून या गावांवर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात वेळ पडली तर न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही केसरकर यांच्यासह कुलकर्णी आणि बधे (BJP Leader Keskar, Kulkarni, Badhe) यांनी दिला. केसरकर म्हणाले, "या निर्णयाबाबत योग्य हरकत घेणार आहोत. राज्य सरकारकडून हरकतीवर विचार झाला नाहीतर आम्ही उच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहोत. कुठल्याही परिस्थिती नागरिकांना त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे."

Vijay Shivtare, Ujjwal Keskar
Sharad Pawar : फडणवीस अन् अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा होणार का? प्रश्नावर पवारांची गुगली

पुणे महापालिकेतून (PMC) गावे वगळण्यापेक्षा शहरात दोन महापालिका करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, "पुण्यात दोन महापालिकांचे प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही पुनरूच्चार केलेला आहे. या प्रस्तावास आमदार चेतन तुपेही (Chetan Tupe) आग्रही आहेत. त्यामुळे दोन महानगरपालिका निर्माण करण्याचा प्रस्ताव देणार आहोत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com