CJI Surya Kant latest news : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा याचिकाकर्त्याला झटका; म्हणाले, "कॉक्रोच जनता पार्टी' विरोधात तत्काळ सुनावणीची गरज नाही..."

Justice Surya Kant statement today : कॉक्रोच जनता पार्टीने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
CJI Surya Kant
CJI Surya KantSarkarnama
Published on
Updated on

सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अर्थात CJP विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. यावेळी वकील एन.के. गोस्वामी यांनी न्यायालयासमोर भूमिका मांडताना काही व्यक्ती न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना CJI सूर्य कांत यांनी या विषयाकडे अतिशय भावनिक पद्धतीने पाहण्याची गरज नसल्याचे सांगितले. तसेच, “या प्रकरणात तत्काळ सुनावणीची आवश्यकता वाटत नाही, योग्य वेळी पाहू,” असेही त्यांनी सांगितले.

CJI Surya Kant
Pune Illegal Bangladeshi Immigrants : पुण्याचा बुधवार पेठ परिसर बनतोय 'मिनी बांगलादेश? पकडलेल्या बांगलादेशींची आकडेवारी ऐकून जाल चक्रावून

दरम्यान, दुसऱ्या एका वकिलाने न्यायालयीन चर्चेचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच बनावट पदवीधारक वकिलांबाबत CBI चौकशीची मागणीही करण्यात आली. याचिकेत काही व्यक्तींनी खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे वकिली व्यवसायात प्रवेश केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात 15 मे रोजी झालेल्या एका सुनावणीतून झाली होती. त्यावेळी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी काही बेरोजगार युवक आणि तथाकथित कार्यकर्त्यांवर टीका करताना “कॉकरोच” आणि “परजीवी” अशा शब्दांचा उल्लेख केला होता. या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि काही स्तरातून त्यावर टीकाही करण्यात आली.

CJI Surya Kant
Mahabaleshwar Tourism : महाबळेश्वर, पाचगणीला जाताय? पर्यटकांसाठी नगरपालिकेची 'ही' मोठी गूडन्यूज नक्की वाचा!

वाद वाढल्यानंतर CJI सूर्य कांत यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश देशातील युवकांचा अपमान करण्याचा नव्हता. बनावट पदवी वापरून प्रतिष्ठित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या लोकांवर त्यांनी टीका केली होती. भारतीय युवकांविषयी आपल्याला प्रचंड अभिमान असून ते विकसित भारताचे भविष्य असल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com