

CJP protest update : कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील संसद मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेकांनी पोलिसांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतची एक तातडीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सुनावणीला आली होती. याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी सुनावणीदरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जचे व्हिडिओ पाहून याची दखल घेण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली होती. पण सरन्यायाधीशांनी व्हिडिओ पाहायला आपल्याकडे वेळ नाही, असे म्हटले.
याचिकाकर्त्या वकिलांनी कोर्टात पोलिसांकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराची माहिती दिली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. तुम्हीच हे व्हिडिओ पाहावेत आणि याची समोटो दखल घ्यावी, अशी विनंती वकिलांनी केली होती.
वकील आपले म्हणणे मांडत असतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांना मधेच थांबविले आणि म्हटले की, व्हिडिओ पाहण्यात आम्हाला रस नाही, कारण तेवढा वेळ आमच्याकडे नाही. तुम्ही कोर्टाचा आणि स्वत:चाही वेळ वाया घालवू नका, असेही कोर्टाने वकिलांना सुनावले. कोर्टाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे सुरूवात सरन्यायाधीश यांच्या एका विधानामुळेच झाली होती. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपहासात्मकपणे सीजेपीची सुरूवात केली होती. पण त्याला सोशल मीडियात अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याला आंदोलनाचे स्वरुप आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.