CJP नंतर आता आणखी दोन मुद्दे उडविणार मोदी सरकारची झोप; 'इन्स्टाग्राम'वर वेगाने वाढतायेत फॉलोअर्स

Cockroach Janata Party, E20 Janata Party, Reservation Hatao Andolan : कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच E20 जनता पार्टी हे अकाऊंट इन्स्टाग्रामवर सुरू करण्यात आली आहे.
Modi Government
Modi GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Social Media trending : सोशल मीडियात सुरूवात झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने काही दिवसांतच केंद्र सरकारला जोरदार हादरा दिला. या पार्टीने सोशल मीडियातील लोकप्रियतेला एक मुद्दा देत सरकारविरोधात उभे केले. थेट दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. मात्र, सरकारची डोकेदुखी इथेच थांबलेली नाही.

सोशल मीडियात आणखी दोन मुद्दे चांगले तापू लागले आहेत. इन्स्टाग्रामवर ई२० पेट्रोल आणि आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यास सुरूवात झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीसोबतच आता रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन (RHA) आणि E20 जनता पार्टी हे दोन इन्स्टाग्राम अकाऊंट ट्रेंडिंगमध्ये आहेत.

काय आहे RHA?

शिक्षण, नोकरीमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात हे अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. मागील काही दिवसांतच तब्बल ४३ लाख फॉलोअर्स झाले आहेत. रिझर्व्हेशन रिमूव्हल संघ (RSS) या नावानेही आरक्षणाविरोधातील एक अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. त्याचे फारसे फॉलोअर्स नाहीत. सध्याच्या आरक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करून सर्वांना समान संधी देण्याची RHA वर भूमिका मांडली जात आहे.

Modi Government
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

सर्वांना समान संधी, शिक्षण-नोकरी आणि सर्व क्षेत्रात आरक्षण पूर्णपणे बंद करणे, केवळ योग्यतेच्या आधारावरच निवड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, आरक्षण धोरणाची वेळोवेळी समिक्षा व्हावी, जातीआधारित राजकारण बंद व्हावे, आदी मागण्या RHA कडून करण्यात आले आहेत. या अकाऊंटवर याविषयी १०८ पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Modi Government
UPA ministers resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशात वणवा, मनमोहन सिंग सरकारच्या काळात किती झाले होते राजीनामे? यादी वाचूनच बसेल धक्का...

E20 जनता पार्टीच्या मागण्या

कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच E20 जनता पार्टी हे अकाऊंट इन्स्टाग्रामवर सुरू करण्यात आली आहे. या अकाऊंटवर आतापर्यंत ८४ पोस्ट करण्यात आल्या असून २ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. E20 पेट्रोलप्रमाणेच ग्राहकांना १०० टक्के शुध्द पेट्रोल खरेदी करण्याचा अधिकार असावा, अशी या पार्टीची प्रमुख मागणी आहे. त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com