

CJP Protest: देशाची राजधानी दिल्लीत १० ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार होते. पण तत्पूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांना समर्थन देणाऱ्या हजारो जेनझी तरुणांना तसंच सर्वच वयोगटातील नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण आंदोलन होऊ दिलं नाही.
सीजेपीचे पहिल्या फळीतले कार्यकर्ते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी वर्षभर शांतता भंग होईल असं आंदोलन करायचं नाही या अटीवर सोडून दिलं. पण आज हेच कार्यकर्ते पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. तसंच त्यांनी दिल्ली पोलिसांनाच अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
कॉक्रोच जनता पार्टीनं कोर्टाच्या अटी-शर्तींचं पालन करुन पुन्हा एकदा शांततेत आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सोमवारी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांना आंदोलनासाठी तारीख देण्याची मागणी केली. या दोन्ही कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, पोलिसांनी आम्हाला पुढील २४ तासांत आंदोलनाची तारीख आणि वेळ सांगावी, जर त्यांनी या वेळेत जर पारवानगी दिली नाही तर सीजेपी स्वतः वेगळ्या आंदोलनाची घोषणा करेल. आम्हाला शांततेत आमची बाजू मांडायची आहे, त्यासाठी आम्ही पोलिसांकडं तारखेची मागणी करत आहोत.
पोलीस स्टेसनला पोहोचण्यापूर्वी आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया एक्सवर याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सोमवारी सकाळी १० वाजता मी सौरव दास आणि रत्ना सिंह आणि संघटनेच्या दुसऱ्या सहकाऱ्यांसह पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाणार आहोत. आमचा उद्देश हा जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करण्याची तारीख मिळवणं हे आहे. पोलिसांनी २४ तासांत आम्हाला आंदोलनासाठी तारीख द्यावी अन्यथा आम्हीच आंदोलनाची तारीख जाहीर करु, असा अल्टिमेटम सीजेपीनं दिल्ली पोलिसांना दिला.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं की, पोलीस विशेषतः आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी १० दिवस आधी संपर्क करण्यास सांगतात. आता संघटनेद्वारे आम्हीच पोलिसांना आवाहन करत आहोत की त्यांनी त्यांच्या हिशोबानं आंदोलनाची तारीख आणि वेळ आम्हाला द्यावी. आमच्या संघटनेचं आंदोलनामागचा उद्देश हाच आहे की, त्यांना शांततेत विरोध नोंदवण्याची संधी दिली जावी.
दिल्लीत १० ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना अटी-शर्तींवर सोडून देण्याचे आदेश पोलिसांना दिले. यामध्ये वर्षभर त्यांना शांतता भंग होईल असं कुठलंही आंदोलन करता येणार नाही, या अटीवर सोडण्यात आल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी काल पोलिसांच्या ताब्यात असतानाही आंदोलन हे सुरुच राहील अशी घोषणा केली होती. वर्षभर कुठलंही आंदोलन करायचं नाही या अटीवर या तिघांना सोडण्यात आल्याची बातमी बाहेर आल्यानंतर अनेकांनी दिपके, रांका आणि दास यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. त्यानंतर दिपके यांनी सोशल मीडियातून हे स्पष्ट केलं की, आम्ही असा कुठलाही बाँड पोलिसांनी लिहून दिलेला नाही की आम्ही आंदोलन करणार नाही. आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.