CJP Protest: जंतर-मंतरवर साध्या वेशात नाही, फक्त युनिफॉर्मवच! दिल्ली पोलिसांचे कर्मचाऱ्यांना आदेश

नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. रविवारी इथं निघालेल्या मोर्चामध्ये मोर्चेकरी तरुणांना झोडपताना पोलिसांबरोबरच काही साध्या वेशातील लोकही दिसत होते.
CJP Protest: जंतर-मंतरवर साध्या वेशात नाही, फक्त युनिफॉर्मवच! दिल्ली पोलिसांचे कर्मचाऱ्यांना आदेश
Published on
Updated on

CJP Protest: नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. रविवारी इथं निघालेल्या मोर्चामध्ये मोर्चेकरी तरुणांना झोडपताना पोलिसांबरोबरच काही साध्या वेशातील लोकही दिसत होते. त्यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला होता, हे लोक नेमके कोण आहेत? हातात काठी घेऊन ते तरुणांना का मारत आहेत? असे प्रश्न उपस्थित झाले होते. यामुळं दिल्ली पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. याच पार्श्वभूमीवर आता क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी एकही पोलीस साध्या वेशात दिसणार नाही, तो संपूर्ण गणवेशातच असला पाहिजे असे निर्देश दिल्ली पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काढले आहेत.

CJP Protest: जंतर-मंतरवर साध्या वेशात नाही, फक्त युनिफॉर्मवच! दिल्ली पोलिसांचे कर्मचाऱ्यांना आदेश
CJP Protest: सरकार बॅकफूटवर? सीजेपीच्या आंदोलकांचा मोठा निर्णय! चर्चा कशी व्हावी यासाठी घातल्या अटी; सौरव दास यांची माहिती

सीजेपीनं संसदेवर काढलेल्या मोर्चामध्ये अनेक तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही पोलिसांच्या वेशात होते तर काही जण साध्या वेळात होते. तर काही पोलीशी गणवेशात असले तरी त्यांच्या छातीवर नेमप्लेट नव्हती. त्यामुळं यावरुन दिल्ली पोलीस टीकेचे धनी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना मारण्यासाठी साध्या वेशातील गुंडांना परवानगी दिली आहे का? असे कठोर सवालही विचारले गेले.

यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री मुख्यालयातून सर्व युनिट्सना संदेश पाठवण्यात आला की, जो कोणी पोलीस जतंर-मंतरवर तैनात असेल तो केवळ पोलिसांच्या वेशातच दिसला पाहिजे, साध्या वेशात दिसता कामा नये. कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्या ट्विटरवरुन दिल्ली पोलिसांना आवाहन केलं होतं की, हे हातात लाठी घेतलेले साध्या वेळातील हे गुंड कोण आहेत? यांना तरुणांना मारण्यासाठी कोणी कामावर ठेवलं आहे? या ट्विटला दिल्ली पोलिसांनी प्रसिसाद देत मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com