CJI Dhananjay Chandrachud News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सर्वात मोठा अन् धाडसी निर्णय

Supreme Court Big Update : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या आणि भारतीय कायद्याच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि तितकाच धाडसी निंर्णय घेतला आहे.
Dhananjay Chandrachud
Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या आणि भारतीय कायद्याच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि तितकाच धाडसी निंर्णय घेतला आहे. आजपर्यंत न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची.

पण आता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच लायब्ररीतील न्यायदेवतेच्या हातात आता तलवारीऐवजी संविधान असणार आहे.या निर्णयामागे न्यायालयात आणखी डोळस पध्दतीने न्याय देण्याचा उद्देश असल्याची माहिती समोर येत आहे.

भारतातील न्यायव्यवस्थेचं अत्यंत महत्वाचं प्रतीक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याचं स्वरूप मोठा बदल करण्यात आला आहे. आता न्यायदेवतेच्या डोळ्यावर असलेली काळी पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच यापूर्वी ज्या हाती तलवार होती, त्याऐवजी न्यायदेवतेच्या हाती संविधान दिसून येत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवा पुतळा बसवण्यात आला आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने लायब्ररीत काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेल्या पुतळ्याद्वारे न्याय हा आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी न्यायदेवता ही तलवारीऐवजी संविधानाच्या (Constitution) आधारे काम करतो हेही दाखवण्याचा प्रयत्न या पुतळ्याद्वारे केला असल्याचंही बोललं जात आहे.

Dhananjay Chandrachud
Ghansawangi Assembly Constituency 2024 : शिवसेनेच्या शिवाजी चोथेंचा दावा, घनसावंगीत टोपेंची डोकेदुखी वाढणार !

चंद्रचूड यांनी मोठं विधान

काही दिवसांपूर्वी भूतानमध्ये एका कार्यक्रमात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी मोठं विधान केलं होतं. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते, मी दोन वर्ष देशाची सेवा केल्यानंतर यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारताचे सरन्यायाधीश पद सोडेल. माझा कार्यकाळ संपतोय. त्यामुळं माझं मन भविष्य आणि भूतकाळातील शंका आणि चिंताबद्दल विचार करत आहे. मी अशा प्रश्नांवर विचार करतोय की,मी ते सगळं साध्य केलं आहे का, जे मी ठरवलं होतं? असा सवालही त्यांनी स्वत:लाच केला होता.

धनंंजय चंद्रचूड यांनी आपल्या सरन्यायाधीशापदाच्या कार्यकाळात मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 11 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून LLB केली आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत.

Dhananjay Chandrachud
Assembly Elections : काँग्रेसची पहिली यादी 'या' तारखेला येणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचही ठरलं

त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ (1978 ते 1985) CJI राहण्याचा विक्रम आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या कार्यकाळात, इलेक्ट्रॉल बाँड, सबरीमाला, शिवसेना ,राष्ट्रवादी काँगेस पक्षफुटी प्रकरण, समलैंगिकता, आधार आणि अयोध्याशी संबंधित मोठे निकाल दिले होते. तसेच त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंत अनेक चर्चेतील खटल्यांच्या सुनावण्या पार पडल्या आहेत.

भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत आणि खटल्यांचे वाटप करतात आणि इतर प्रमुख जबाबदाऱ्यांसह कायद्याच्या महत्त्वाच्या बाबी हाताळणाऱ्या घटनापीठांची नियुक्ती करतात. सध्या या पदावर धनंजय चंद्रचूड हे विराजमान आहेत. त्यांची नियुक्ती 9 नोव्हेंबर 2022 रोजी झाली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये ते निवृत्त होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com