लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नुकतीच मुख्यममंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी खासदारकीचा राजीनामा विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले आहे. त्यामुळे विधानसभेत हे दोन्ही नेते पुढील पाच वर्षे दोन हात करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन्ही नेते सोमवारी पहिल्यांदाच समोरासमोर आले.
यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवला. याचवेळी समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आमदारकीसाठी खासदारकीवर पाणी सोडले आहे. अखिलेश यांनी आता दिल्लीऐवजी उत्तर प्रदेशवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तर योगींनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कामालाही सुरूवात केली. (UP Election 2022)
निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे विधानसभेत दोघांमध्यो जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. योगी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी न सोडण्याचे धोरण समाजवादी पक्षाचे आहे. पण त्यापूर्वी सोमवारी दोघेही नेते आमनेसामने आले. विधानसभेत या दोघांसह इतर आमदारांना शपथ देण्यात आली.
त्यापूर्वी योगी आणि अखिलेश यांनी एकमेकांच्या हातात हात मिळवला. यावेळी योगींनी अखिलेश यांच्या पाठीवर थापही मारली. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघेही पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. योगी हे गोऱखपूर मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. तर अखिलेश यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत करहल मतदारसंघातून विजय मिळाल्याने खासदारकीचा राजीनामा दिला.
दरम्यान, खासदारकीच्या राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले होते की, उत्तर प्रदेशातील कोट्यवधी जनतेने आम्हाला मते दिली आहे. विधानसभा निवडणुकीत आमचा नैतिक विजय झाला आहे. याचा मान राखण्यासाठी मी करहल विधानसभा मतदारसंघातील आमदारकी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी आझमगडच्या विकासासाठीही मी कटिबद्ध आहे. महागाई, बेरोजगार आणि सामाजिक असमानता या विरोधात लढण्यासाठी हा त्याग आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.