CJP News: 'कॉक्रोच जनता पार्टी'चं वादळ पुन्हा दिल्लीत घोंघावणार, महिनाभरातच मोदी सरकारवर गंभीर आरोप; तडकाफडकी मोठी घोषणा

Cocroach Janta Party: देशातील तरुणाई, विशेषत: जेन झी एकत्र आल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील जंतरमंतरसह संपूर्ण देशानं पाहिलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं डिजिटल क्रांती घडवून उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनापुढं केंद्रातील मोदी सरकारलाही झुकावं लागलं.
CJP News.jpg
CJP News.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: देशातील तरुणाई, विशेषत: जेन झी एकत्र आल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील जंतरमंतरसह संपूर्ण देशानं पाहिलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं डिजिटल क्रांती घडवून उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनापुढं केंद्रातील मोदी सरकारलाही झुकावं लागलं. मोदी सरकारला 12 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. तसेच सीजेपीच्या आंदोलनाच्या सर्व मागण्याही मान्य कराव्या लागल्या होत्या. त्या मान्य झाल्यानंतरच जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. आता सीजेपीनं पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने सोमवारी(ता.24 ऑगस्ट) पुन्हा एकदा देशातील जेन झीला हाक दिली आहे. सीजेपीकडून येत्या 5 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे देशव्यापी शांततापूर्ण निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाची घोषणा करतानाच 25 जुलै रोजी केंद्र सरकारने तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आल्याचा आरोप सीजेपीकडून करण्यात आला आहे.

सीजेपीकडून केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांनंतर देशभरातील युवकांनी विश्वासाच्या भूमिकेतून आपले आंदोलने मागे घेतलं होतं. मात्र, आता सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याचा आरोप करत सीजेपीनं पुन्हा एकदा 5 सप्टेंबर रोजी शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन पोलीस मुख्यालयाच्या दिशेने काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व मृत NEET विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह पोलीस अत्याचाराच्या बळींचे कुटुंबीय करणार आहेत. देशभरातील विद्यार्थी, युवक संघटना आणि तरुण, नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही सीजेपीकडून करण्यात आलं आहे.

CJP News.jpg
Ashok Kharat Crime: अशोक खरात प्रकरण: चाकणकरांची बदनामी अंगलट,19 जणांवर गुन्हा दाखल; रुपाली पाटील-ठोंबरे, अंधारेंसह अभिनेत्रीचाही समावेश

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र

दिल्लीतील जंतरमंतरवरील पेपरफुटी प्रकरणांविरोधातील आंदोलनाला यश आल्यानंतर 15 ऑगस्टपासून सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं आहे. या अभियानातंर्गत राज्यातील व देशातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या दुरावस्थेविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश सरकारी शाळांची दुरावस्था चव्हाट्यावर आणून सरकारला विद्यार्थ्यांसाठी मूलभूत आणि दर्जेदार सुविधा पुरवण्यास भाग पाडणे हा आहे. एकीकडे हे अभियान सुरू असतानाच अभिजीत दिपके यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांबाबतच्या पायाभूत सुविधा, अवस्था अत्यंत बिकट असल्याचं आहे. असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक आणि निमंत्रक अभिजीत दिपके यांनी देशभरातील सर्व राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना थेट पत्र लिहून शाळांच्या सद्यस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच दिपके यांनी शाळांच्या वास्तविक स्थितीची माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

CJP News.jpg
Manoj Jarange Patil : 'मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून सोलापुरात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल'

जनावरांपेक्षाही वाईट वागणूक

दिपके यांनी या पत्रात शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, वापरायोग्य स्वच्छतागृहे, सुसज्ज वर्गखोल्या आणि बसायला साधे बाक (बेंचेस) देखील उपलब्ध नसल्याची खंत या व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सरकारी शाळांमधील व्हिडिओ आणि फोटो धक्कादायक असून देशातील कोणत्याही विद्यार्थ्याला अशा बिकट परिस्थितीत शिकण्याची सक्ती केली जाऊ नये, असे पत्रात म्हटले आहे.

मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, सरकारने युद्धपातळीवर शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे.हे कुठल्या एका पक्षाचे किंवा सरकारचे राजकारण नसून देशाच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, असंही शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिपके यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com