Ashok Kharat Crime: अशोक खरात प्रकरण: चाकणकरांची बदनामी अंगलट,19 जणांवर गुन्हा दाखल; रुपाली पाटील-ठोंबरे, अंधारेंसह अभिनेत्रीचाही समावेश

Pune News: पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी तब्बल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणकरांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
Rupali Chakankar,Ashok Kharat Case
Rupali Chakankar,Ashok Kharat Case Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं नाशिकसह संपूर्ण राज्य हादरलं होतं. याचदरम्यान, एकीकडे खरातच्या अडचणी वाढत असतानाच दसरीकडे रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्षाच्या महिला नेत्यांकडूनही वारंवार चाकणकरांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. या होत असलेल्या बदनामीनंतर चाकणकरांनी कायदेशीर कारवाईसाठी कठोर पावले उचलली. याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी तब्बल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणकरांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांसह विविध पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या,प्रवक्त्या आणि पदाधिकारी ,अभिनेत्रींचा समावेश आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे,गीता तिवारी, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्यासह हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्या नावांचा समावेश आहे.

Rupali Chakankar,Ashok Kharat Case
BJP Leader : भाजपमध्ये पक्ष विलीन केला, पण विचार न पटल्याने सोडचिठ्ठी; बडा नेता CM विजय यांच्या गळाला

रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाल्यानंतर मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे जात होत्या,असं चाकणकर यांनी म्हटलं होतं.

तसेच 18 मार्च 2026 रोजी अशोक खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे टीव्ही व प्रसार माध्यमांमधून समजल्यानंतर, त्यांच्यासोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो-व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबद्ध आरोप सुरू झाल्याचा उल्लेख चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Rupali Chakankar,Ashok Kharat Case
Parbhani Politics: 'मित्राची गद्दारी अन् शत्रूची साथ!' शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; आमदार सईद खान यांचा थेट राजेश विटेकरांवर बॉम्ब!

या तक्रारीत रुपाली चाकणकर यांनी त्या 20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना सुमारे 19 फेसबुक / इन्स्टाग्राम / यू ट्यूब अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅट फॉर्मवरुन बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती त्यांनी तक्रारीद्वारे दिली आहे.

या पोस्ट करणार्‍यांमध्ये संगिता तिवारी, अॅड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सर्मींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिधान्त, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांचा समावेश असल्याचं पोलिसांच्या तक्रारीत म्हटलं होतं.

Rupali Chakankar,Ashok Kharat Case
OBC Reservation : भुजबळांनी जरांगेंबाबत मवाळ भूमिका घेताच वडेट्टीवारांनी डाव टाकला; ओबीसी नेत्यांची स्वतंत्र मोट बांधणार, दिवसही ठरला...

तसेच संबंधित लोकांनी चाकणकरांविरोधात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद भाष्य करत विनयभंग व मानहानी केल्याचा दावा फिर्यादीत केला चाकणकरांमार्फत करण्यात आला होता. याप्रकरणी स्क्रीनशॉट आणि पोस्टचे पुरावेही पोलिसांना सादर केल्याचं चाकणकर यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com