यास्मिन वानखेडे मैदानात, मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिसांकडे तक्रार

समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
Yasmeen Wankhede
Yasmeen WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याचे एनसीबीने जाहीर केले होते. अशातच आता मुंबई पोलिस देखील या आरोपांची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरुच ठेवले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी वानखेडेंचे बर्थ सर्टिफिकेट, त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा, त्यांचे काही कौटुंबिक फोटो प्रसिद्ध केले आहेत.

Yasmeen Wankhede
समीर वानखेडे म्हणतात, ती तर आईची इच्छा!

मात्र आता मलिक यांना हेच आरोप भोवण्याची शक्यता आहे. कारण समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच मलिकांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. एका महिलेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी यास्मिन यांनी पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. एका नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत? त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत आमचे फोटो पोस्ट करत आहेत. मलिकांनी खोटे आरोप करत आमची बदनामी केली असून आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे असे आरोप यास्मिन यांनी केले आहेत.

तर राजीनामा देईन, मलिकांचे आव्हान.

मी केलेले सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरले तर राजीनामा देवून राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे. सोबतच हे खोटे ठरले तर किमान त्यांनी तरी माफी मागावी. तशीही त्यांची नोकरी तर जाणारच आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Yasmeen Wankhede
समीर वानखेडे यांच्या मूळ गावातील कागदपत्रे काय सांगतात? : चुलत्याने सांगितली वस्तुस्थिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com