Congress Politics : बहुमताचा कौल, तरी काँग्रेस सावध ! तेलंगणात 'बी' प्लॅनची तयारी...

D. K. Shivakumar : पाचही राज्याxत काँग्रेसची सत्ता स्थापन होणार, डीकेंना विश्वास
Telngana Congress
Telngana CongressSarkarnama
Published on
Updated on

Telangana Political News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलमधून राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे, तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा झेंडा फडकवणार असल्याचे बोलले जात आहे. यातच तेलंगणामध्ये सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेस बाजी मारणार असल्याचे पोलमधून सांगितले आहे. मिझोरममध्ये स्थानिक पक्षांतच लढत होणार आहे. तेलंगणात सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने आतापासून रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे.

तेलंगणात ११९ पैकी ६० उमेदवार निवडणूक येतील तो पक्ष सत्ता स्थापन करण्यास पात्र ठरणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलमधून काँग्रेसच्या बाजूने कौल मिळालेला आहे. असे असले तरी पक्षाने आपला बी प्लॅनही तयार ठेवला आहे. राज्यात काँग्रेसला ७० हून कमी जागा मिळाल्या तर निवडलेल्या आमदारांना बंगळुरू किंवा इतर ठिकाणी नेण्याची योजना आहे. त्यांच्यासाठी हॉटेल, रिसॉर्टची तयारी असल्याची माहिती आहे.

Telngana Congress
Solapur NCP : अजित पवारांंनी दिला एकनिष्ठ शिलेदाराला न्याय; दहा वर्षांची प्रतीक्षा संपली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पाचपैकी जास्तीत जास्त राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. पूर्वीच्या अनुभवावरून काँग्रेस आता काँग्रेस हायकमांड कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. तेलंगणात बहुमताचा कौल असला तरी 3 डिसेंबरला घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांचे स्थलांतर करण्याचा विचार काँग्रेस करत आहे. नेहमीप्रमाणे ही महत्त्वाची जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पेलणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डींनी सांगितले, आम्हाला विजयाचा विश्वास आहे. राज्यात 119 पैकी सरकार स्थापनेचा जादुई आकडा 60 आहे. मात्र, गरज पडली तर आमदार बदलण्याची भूमिका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बजावतील. यापूर्वीही 2018 मध्ये कर्नाटक विधानसभेत फ्लोर टेस्टदरम्यान शिवकुमारांनी काँग्रेस आणि जेडीएस आमदारांसाठी अशीच व्यवस्था केली होती. तरीही घोडेबाजारातूनच काँग्रेसचे सरकार पाडले आणि भाजपने सरकार स्थापन केले. तेलंगणात जास्तीत जास्त काळजी घेतली जाईल.

Telngana Congress
Madhya Pradesh Election : 'लाडली बेहना' शिवराज सिंह चौहान यांना 'मामा' बनवणार?

आमदारांसाठी रिसॉर्ट्स तयार

तेलंगणातील घोडेबाजार टाळण्यासाठी शिवकुमार आणि राज्य युनिट आमदारांच्या राहण्यासाठी किमान दोन-तीन रिसॉर्ट्स किंवा स्टार हॉटेल तयार आहेत. तसेच वेळ पडली तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील आमदारांच्याही निवासाची अतिरिक्त व्यवस्थेची काळजी घेण्यात आलेली आहे.

पाचही राज्यांत काँग्रेसला बहुमत

तेलंगणात 70 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर आमचे आमदार सुरक्षित ठेवण्याची गरज भासणार नाही. मात्र, ही संख्या ७० च्या खाली गेली तर आमदारांना बंगळुरूला आणले जाईल. पक्षश्रेष्ठींना हव्या त्या गोष्टी केल्या जातील. माझ्या मात्र एक्झिट पोलवर विश्वास नसून काँग्रेस पाचही राज्यांमध्ये आरामात निवडून येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Telngana Congress
Ahmednagar Politics : विखे-तनपुरे-कर्डिले गट पुन्हा आमने सामने... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com