New Criminal Laws : नवीन फौजदारी कायदे लागू; काँग्रेसला झाली 146 खासदारांच्या निलंबनाची आठवण

Congress Parliament MP Suspension BNS : देशभरात सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसन सरकारवर टीका केली आहे.
New Criminal Laws
New Criminal LawsSarkarnama

New Delhi : देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर काँग्रेसला 146 खासदारांच्या निलंबनाची आठवण झाली. संसदेमध्ये खासदारांचे निलंबन करून हे कायदे पारित करणअयात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे इतर नेत्यांनीही सोमवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. खर्गे यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत राजकीय आणि नैतिक झटका बसल्यांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवाले संविधानाचा आदर करत असल्याचा दिखावा करत आहे.

New Criminal Laws
Rahul Dravid Vs Rahul Gandhi : आयुष्यात अडचणी आल्यास राहुल द्रविडसारखे बना, राहुल गांधी नाही!

खरे तर आजपासून लागू होत असलेले तीन कायदे 146 खासदारांचे निलंबन करून पारित करण्यात आले आहेत. इंडिया आता हा बुलडोझर न्याय संसदीय प्रणालीमध्ये चालू देणार नसल्याचा इशारा खर्गे यांनी दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचे जवळपास दोन तृतियांश सदस्य निलंबित करण्यात आले होते. संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेवरून विरोधकांनी केलेल्या आंदोलनानंतर हे निलंबन झाले होते.

संसदेत विरोधकांच्या अनुपस्थितीत तीन कायदे पारित करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही टीका केली आहे. नवीन कायदे म्हणजे 90 ते 99 टक्के कट, कॉपी, पेस्ट असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. आधीच्या कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करूनही त्याची अंमलबजावणी करता आली असते, असेही त्यांनी सांगितले.

New Criminal Laws
Reservation Quota : आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी नितीश कुमार मोदींवर टाकणार दबाव?

दरम्यान, देशात सोमवारपासून भारतीय न्याय संहिता, भारति नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात तिन्ही कायदे पारित करण्यात आले आहेत. कोणत्याही चर्चेविना हे कायदे पारित झाल्याचा दावा करत विरोधकांनी सडकून टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com