Rahul Dravid Vs Rahul Gandhi : आयुष्यात अडचणी आल्यास राहुल द्रविडसारखे बना, राहुल गांधी नाही!

BJP Telangana T20 World Cup India Win : राहुल द्रविड मुख्य पशिक्षक असलेल्या टीम इंडियाने शनिवारी टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. राहुल द्रविड यांची ही शेवटची मॅच होती.
Rahul Gandhi, Rahul Dravid
Rahul Gandhi, Rahul DravidSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारतीय क्रिकेट टीमने शनिवारी इतिहास रचला. तब्बल 17 वर्षानंतर भारताला विश्वचषकावर आपले नाव कोरता आले. त्यामुळे जगभरात भारतीय चाहत्यांकडून या विजयाचा जल्लोष केला जात आहे. खेळाडूंसह प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यात राजकारणाची एन्ट्री झाली आहे.

तेलंगणा भाजपने राहुल द्रविड यांच्यावरून थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तेलंगणा भाजपने एक्सवर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

Rahul Gandhi, Rahul Dravid
Reservation Quota : आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी नितीश कुमार मोदींवर टाकणार दबाव?

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

भारताच्या विजयानंतर तेलंगणा भाजपने जल्लोषाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आयुष्यामध्ये जेव्हा आव्हाने येतील तेव्हा राहुल द्रविड यांच्यासारखे बना, राहुल गांधी यांच्यासारखे नाही.’ भाजपकडून नेहमीच राहुल गांधी यांच्यावर टीका केली जाते.  

भाजपची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली असून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिली आहे. तर सात हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केली आहे. या पोस्टवरून अनेकांनी भाजपवर निशाणाही साधला आहे.

भाजपच्या ट्विटवरून असा तर्क लावला जात आहे की, राहुल द्रविड हे कोणत्याही स्थितीत शांत राहतात. त्यांचा उत्साह अतिरेकी नसतो किंवा पराभव झाल्यानंतरही चिडचिड करत नाहीत. ते नेहमीच शांत दिसतात. शनिवारीच्या मॅचदरम्यानही अंतिम ओव्हर टाकली जात असताना ते अत्यंत शांत दिसून आले.

Rahul Gandhi, Rahul Dravid
Mamata Banerjee : लोकसभा उपाध्यक्षपदासाठी ममतांची खेळी; 'हे' नाव सुचवत दिला काँग्रेसला झटका...

पंतप्रधानांसह राहुल गांधींकडून शुभेच्छा

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी टीममधील सदस्यांशी फोनवरून संवादही साधला. राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.

राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधील टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राहुल द्रविड यांचीही त्यांना आठवण झाली आहे. राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून ही शेवटची मॅच होती. त्यावरून टीमला तुम्ही नसल्याने पोकळी भासेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com