
Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2015 आणि 2020 मध्ये काँग्रेस लढतीत अन्य पक्षापेक्षा सक्रिय नव्हती, पण आता होत असलेल्या विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत पुन्हा येणार, असा विश्वास काँग्रेसला आहे.
आम आदमी पार्टी आपल्या ताब्यातील दिल्ली वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे 27 वर्षांचा सत्तेचा वनवास संपविण्यासाठी काँग्रेससमोर मोठ आवाहन आहे. अशातच काँग्रेस आपले अस्तित्व वाचवण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यासाठी डावपेच आखत आहे.
दिल्लीत या निवडणुकीत सत्ता विरोधी वातावरण आहे, त्याचा फायदा काँग्रेस घेण्याच्या तयारीत आहे. दिल्लीकरांनी मने जिंकण्यासाठी काँग्रेस शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत दिल्लीत भाजप आणि आम आदमी पार्टीत यांच्यात थेट लढत झाली. पण या निवडणुकीत काँग्रस पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
सत्ता विरोधी वातावरण आम आदमी पार्टीच्या विरोधात आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील मतदार हे भाजपचे पारंपरिक मतदार नाही. ते पर्याय म्हणून भाजपकडे पाहतात. काँग्रेसने आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या योजना राबवल्या. त्यामुळे या निवडणुकीत विजय संपादन करण्याचा मनसुबा काँग्रेसने केला आहे.
गेल्या सहा महिन्यापासून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन पक्षाचा विचार घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. न्याय यात्रेचे आयोजन काँग्रेसने केले होते. काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत सुरवातीपासून प्रचाराची रणनीती आखली आहे.
जनतेला आता बदलाव पाहिजे आहे, ते शीला दीक्षित यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळाची आठवण येत असल्याचे शीला दीक्षित यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसचे नेते आवाज उठवताना दिसत आहेत. काँग्रेसने आपल्या उमेदवारांनी यादी सगळ्यात अगोदर जाहीर केली आहे. 2013च्या इतिहासाची पुनरावर्त्ती होईल, असा विश्वास या नेत्यांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.