
Pune 27 Jan 2025: नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटेल , अशी आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे.
यापूर्वी नाशिकसाठी गिरीश महाजन, तर रायगडसाठी आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यात आली आहे. हा वाद आता महायुतीच्या 'कोर्टात'पोहचला असून यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीचे सगळ्याचे लक्ष आहे.
महायुतीनं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी पुन्हा एकदा आदिती तटकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र यावरुन आता नवा वाद उफाळला आहे. रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद जाहीर होताच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. "एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यामुळे ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल" असे गोगावले म्हणाले.
सुरवातीपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अजितदादांच्या नेत्या आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय भरत गोगावले यांच्यात स्पर्धा होती. जाहीर कार्यक्रमात भरतशेठ यांनी मीच राजगडचा पालकमंत्री होणार, असे अनेक वेळा सांगितले आहे. पण भरतशेठचं पालकमंत्रिपदाचं स्वप्न अधुरं राहिले.
आदितीताईंना बाजी मारली. त्या पालकमंत्री झाल्या. त्यांच्या नियुक्ती 24 तास होत नाही तोच नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवर सरकारनं स्थगिती आणली. नाशिकच्या बाबततही तसेच घडलं.
एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय असलेले दादा भुसे यांचे नाव चर्चेत असताना भाजपच्या गिरीश महाजन यांच्या गळ्यात नाशिकच्या पालकमंत्रिपदाची माळ पडली. दादा भुसे आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचे नाव नाशिकचे पालकमंत्री म्हणून घेतले जात होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असे त्यांच्याबाबत बोलले जाते. त्यांची पालकमंत्री पदासाठी नियुक्ती होईल याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बहुतांश नेते अंदाज व्यक्त करत होते. पण तसे झाले नाही. आज दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कुणाचा राज्याभिषेक होणार हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.