Wagholi Accident : अमरावतीहून पुण्यात आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 जणांचा चिरडून मृत्यू

Dumper Accident in Pune : वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.
  Accident
AccidentSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यात रविवारची मध्यरात्र अमरावतीवरुन आलेल्या कामगारांसाठी काळरात्र ठरली. पदपथावर झोपलेल्या 9 जणांना भरधाव डंपरने चिरडले. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी रात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. दोन चिमुरड्यासह एकाचा मृत्यू झाला. वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार (वय २ वर्ष), रीनेश नितेश पवार (वय ३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

  Accident
NCP News: शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य अन् एकीकरणाची चर्चा

अन्य सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. डंपर चालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

  Accident
Maharashtra Latest LIVE UPDATE : श्याम बेनेगल यांचं निधन

फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते.भरधाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावर गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. यातीन तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने वाघोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com