

Punjab Congress News : काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेसनेत्यांमध्ये फूट पडल्याची चित्र आहे. निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी राहुल गांधींनी पंजाबचे प्रभारी भूपेश बघेल यांच्यावर टाकली आहे. मात्र, बघेल यांच्यासमोर पंजाब काँग्रेसचे दोन्ही गट भिडले आहेत.
भूपेश बघेल हे पंजाबच्या 10 दिवशीय दौऱ्यावर आहेत. ते बूथ, ब्लाॅक, जिल्हास्तरावर काँग्रेसची निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी आहे, याचा आढावा घेत आहेत. मात्र, त्यांच्या आढावा बैठकांमध्ये पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. विशेष म्हणजे भूपेश बघेल यांच्या विरोधात देखील घोषणा दिल्या जात आहेत.
संगरूर येथे एका गटातील कार्यकर्त्यांना भूपेश बघेल मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दुसरा गट त्यांना भिडला. दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि त्यांचे समर्थक प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. चेन्नी समर्थक आणि पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग समर्थक यांच्यात बघेल यांच्यासमोरच हाणामारी देखील झाली.
माजी मुख्यमंत्री चन्नी यांचे समर्थक प्रदेशाध्यक्षांना हटवण्याबाबत आग्रही आहेत. याआधी चरणजीतसिंह चन्नी यांच्या सोबत काँग्रेस हायकमांडने बैठक घेत हा वाद मिटवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, चन्नी यांचे समर्थक अजुनही प्रदेशाध्यक्ष हटवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे बघेला यांच्या कार्यक्रमांमध्ये चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांचे समर्थक भिडत आहेत. या गटबाजीची रिपोर्ट बघेल हे काँग्रेस हायकमांडला देणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.