DK Shivakumar : कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना ब्रेक; शिवकुमार यांनीच सांगितलं कारण?

Karnataka Politics : महाराष्ट्राप्रमाणेच गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला होता. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर कर्नाटकात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला होता.
DK Shivakumar, Siddaramaiah
DK Shivakumar, SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Bengaluru News : महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रदेश काँग्रेसचे (केपीसीसी) अध्यक्षपद बदलण्याच्या हालचालींना वेग आला होता. पण उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार पूर्ण आपली पूर्ण फिल्डींग लावत या विषयाला चेकमेट दिला आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना ब्रेक लावत आगामी निवडणुका आपल्याच अध्यक्षतेखाली होतील असा संदेश त्यांनी दिला आहे. यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर यामागे शिवकुमार यांचा काही वेगळा डाव आहे का? अशीही शंका उपस्थित केली जातेय.

कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणूक 2028 मध्ये होणार असून तीन वर्ष हातात असतानाच काँग्रेस तयारीला लागली आहे. सध्या राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व शिवकुमार यांच्याकडे असून तेच काँग्रेसचे प्रदेशाध्य आहेत. अशातच आता अध्यक्षपद बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याने त्यांना हटवले जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे. पण शिवकुमार (DK Shivakumar) यांनी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे नेतृत्व आपल्याकडेच राहील असे सांगत स्वकीयांच्या मनसुब्यांना तिलांजली घातली आहे. तर अजून 8 ते 10 वर्षे आपण सक्रीय राजकारण करू असेही संकेत त्यांनी दिले आहेत.

सध्या कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री शिवकुमार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असून सिद्धरामय्यांना शिवकुमार नको से झाले आहेत. सिद्धरामय्या यांना केपीसीसी अध्यक्षपदावरून शिवकुमार यांना हटवायचं आहे. पण शिवकुमार यांना आत्ताच हे पद सोडायचं नसून त्यांना आगामी विधानसभेपर्यंत आपल्याचकडे हे पद ठेवायचं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी हे विधान केले आहे.

DK Shivakumar, Siddaramaiah
CM Siddaramaiah Vs DK Shivakumar : डीके शिवकुमार यांचा 'GAME'; सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवू शकणार का?

नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात शिवकुमार यांनी याबाबत विधान केलं होतं. त्यांनी ‘डीकेशी, डीकेशी’ अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, पुढील निवडणुक मी आणि माझ्या नेतृत्वाखाली पक्ष जिंकेल तेव्हा अशा घोषणा द्या, असे म्हटलं होतं. तर सध्या आपण फिट्ट असून असून 8 ते 10 वर्षे राजकारणात असेन. माझ्यावर विश्वास ठेवा’, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता नसल्यानेच आता शिवकुमार यांनी स्वतःला भविष्यासाठी तयार केले असून शड्डू ठोकला आहे. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या विरोधकांसाठी एक चेतावणी असल्याचे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आहे.

खर्गे, राहुल यांची घेणार भेट

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उद्या (ता. 25) नवी दिल्लीला रवाना होणार असून ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर आता ते आगामी निवडणुकीच्या अनुशंगानेच हायकमांड यांना भेटण्यासाठी गेल्याची चर्चा रंगली आहे.

DK Shivakumar, Siddaramaiah
DK Shivakumar : शिवकुमार यांची जादू US च्या निवडणुकीतही चालणार? ट्रम्प की कमला हॅरिस, कुणाचं आलं बोलावणं?   

‘स्थानिक’च्या निवडणूक अन् साखळी बैठका

दरम्यान शिवकुमार यांनी शहर आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी साखळी बैठका घेत आजी माजी आमदारांची बैठक घेतली. यावेळी आजी-माजी आमदारांनी सल्लामसलत करताना मे महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com