अहमदाबाद : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी 15 दिवसांपूर्वी पक्षाला रामराम केला होता. पटेल हे भाजप अथवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. (Hardik Patel Latest News)
हार्दिक पटेल यांचा गांधीनगरमध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि सरकारमधील मंत्री उपस्थित होते. हार्दिक यांनी 19 मे रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर 15 दिवसांतच ते भाजपध्ये दाखल झाले आहेत. आज भाजपमध्ये दाखल होण्याआधी हार्दिक पटेलांनी ट्विट करत आगामी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, देशहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताची भावना डोळ्यासमोर ठेवून मी आज एका नवा अध्यायाची सुरवात करीत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी सुरू असलेल्या भगिरथ कार्यात मी एका छोटा सैनिक बनून काम करेन.
हार्दिक पटेल हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांच्या गुप्त बैठका दोन महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी ते भाजप किंवा आपमध्ये उडी मारतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांचा पक्षप्रवेश झाला असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.