गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. त्यातच त्यांनी भाजपचं (BJP) तोंडभरून कौतुक केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिक पटेल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. याचवेळी त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. मात्र, त्यांनी तोंडभरून भाजपचे कौतुक केले आहे. यामुळे पटेल हे भाजपशी जवळीक साधू शकतात, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे. ते म्हणाले की,भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.
पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशी चर्चा गुजरातमध्ये सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन. आम्ही गुजरातचा चांगला विकास करू. पक्षामध्ये काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण आम्हाला गुजराच्या विकासासाठी एकत्र राहून काम करायचे आहे, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.