Lok Sabha Election Result 2024: ...तर देशाला पुढच्या 48 तासांत नवा पंतप्रधान देणार; 'या' नेत्याचा मोठा दावा

Lok Sabha Election Result 2024: एकीकडे एनडीए आघाडीने 'अब की बार चारसो पार' म्हणत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने यंदा भाजपला हद्दपार करुन आम्हीच सत्ता स्थापन करु असा दावा केला आहे.
India Alliance News
India Alliance NewsSarkarnama

Lok Sabha Election Result: देशातील लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून उद्या 1 जून रोजी शेवटचा म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. देशात पुढील पाच वर्षांसाठी कोण सत्ता गाजवणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे. परंतु त्याआधीच काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी इंडिया आघाडीला बहुमत मिळताच 48 तासांच्या आत पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार असल्याचा दावा केला आहे.

एकीकडे भारतीय जनता पक्ष प्रणित NDA आघाडीने 'अब की बार चारसो पार' म्हणत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने यंदा भाजपला हद्दपार करुन आम्हीच सत्ता स्थापन करु असा दावा केला आहे. मात्र मतदार नेमकं कोणाला बहुमत देणार हे चार जूनला कळणार आहे. अशातच आता काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीत ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा पंतप्रधान असेल. 2004 मध्ये 13 मे रोजी लोकसभेचा निकाल आला आणि 17 मे रोजी डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव समोर आलं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर निकालानंतर 48 तासांच्या आत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असा दावा जयराम रमेश यांनी केला.

India Alliance News
Gujarat Satta Bazar Predictions : गुजरातमधील सट्टा बाजारात धक्कादायक कल; मोदी-शाहांचे टेन्शन वाढवले

तर निकालाच्या 2 दिवस आधीच म्हणजे 1 जूनला दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) इतर अनेक नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीत निकालासंदर्भात चर्चा होणार होईल. तसंच इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसची पंतप्रधानपदासाठी पहिली पसंद राहुल गांधींना (Rahul Gandhi) आहे. त्यांच्या नावाला काँग्रेसची संमती असली तरी इंडिया आघाडीचं यावर एकमत होणार का? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. अशातच आता निकालानंतर अवघ्या 48 तासात पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार असा दावा जयराम रमेश यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून इंडिया आघाडीचा हा उमेदवार नेमका कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

India Alliance News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेना; कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com