वादग्रस्त वक्तव्य भोवलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याला विधानसभेत मागावी लागली माफी

वादग्रस्त वक्तव्य अंगलट येत असल्याचे दिसल्याने काही तासांतच काँग्रेसच्या बड्या नेत्याने जाहीर माफी मागितली आहे.
Karnataka Assembly

Karnataka Assembly

Sarkarnama

Published on
Updated on

बंगळूर : वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेणारे कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly) माजी अध्यक्ष आणि काँग्रेस (Congress) ज्येष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार (K R Ramesh Kumar) पुन्हा एकदा वादात अडकले आहे. विधानसभेमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला. हे वक्तव्य अंगलट येत असल्याचे दिसल्याने काही तासांतच कुमार यांनी जाहीर माफी मागितली आहे.

बलात्कारापासून (Rape) वाचू शकत नसाल, तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान रमेश कुमार यांनी केलं होते. विशेष म्हणजे त्यावर विधानसभेचे अध्यक्ष व सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदारही काही बोलले नाहीत. उलट रमेश कुमार यांच्या विधानावर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी हेसुद्धा हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याने आणखी संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर मोठा गदारोळ झाल्याने कुमार यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

कुमार यांनी म्हटले आहे की, माझ्याकडून अनवधानाने आणि दुर्लक्षाने झालेल्या विधानाबद्दल मी सर्वांची माफी मागतो. माझा हेतू या घृणास्पद गुन्ह्याबद्दल चेष्टा करण्याचा अजिबात नव्हता. संदर्भ तोडून माझ्या विधानाचा अर्थ काढण्यात आला. यापुढे मी बोलताना शब्द जपून वापरेन.

<div class="paragraphs"><p>Karnataka Assembly</p></div>
जात पडताळणी समितीला वानखेडेंची हुलकावणी; मागितला आणखी वेळ

विधानसभेमध्ये पाऊस आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानीवर चर्चा सुरू होती. या वेळी काही आमदार आपल्या भागातील लोकांना झालेल्या त्रासाची माहिती देऊ इच्छित होते. विधानसभा अध्यक्षांजवळ कामकाजासाठी मात्र फारसा वेळ नव्हता. त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत चर्चा पूर्ण करायची होती. तर आमदार वेळ वाढवून देण्याची मागणी करत होते. त्यानंतर कागेरी हसत हसत म्हणाले की, मी आता अशा स्थितीत आहे की, जिथे मला केवळ आनंद घेत हा-हा म्हणायचे आहे. ठीक आहे. मला आता असे वाटते, की समोरील स्थिती नियंत्रित करणे सोडून द्यावे. तुम्ही सगळ्यांनी आपले म्हणणे मांडावे, असे मला सगळ्यांना सांगावेसे वाटते.

<div class="paragraphs"><p>Karnataka Assembly</p></div>
घराणेशाहीत गांधींनंतर देवेगौडांचा झेंडा; घरातच दोन खासदार अन् चार आमदार!

रमेश कुमार यांनी यावर आक्षेप घेत म्हटले होते की, 'एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार होणारच असेल, तर झोपा आणि आनंद घ्या. तुम्ही अशाच स्थितीत आहात.' रमेश कुमार यांच्या विधानावर कागेरी यांच्यासह सभागृहातील सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांतील एकाही आमदाराने आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे कागेरी हे कुमार बोलत असताना हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com