तुरुंग की पंचतारांकीत हॉटेल? सिद्धूंना मिळतोय महागडा आहार

सिद्घूंचा डाएट चार्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Sarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू हे पतियाळा कारागृहात आहेत. सिद्धूंना कारागृहात मिळत असलेल्या आहार आता समोर आला आहे. सिद्धूंचा डाएट चार्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळं हे कारागृह आहे की पंचतारांकीत हॉटेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Congres Leader Navjot Singh Sidhu News)

सिद्घूंचा दिवस सकाळी रोझमेरी चहा, पेठा ज्युस अथवा शहाळ्यानं होतो. त्यांना नाश्त्याला कपभर लॅक्टोज फ्री दूध दिलं जात. याचबरोबर सूर्यफुल, कलिंगड, चिया यांच्या बिया, पाच ते सहा बदाम, एक अक्रोड आणि दोन पेकन नट्स दिले जातात. याचबरोबर दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा त्यांचा आहारही वेगळा आहे. सिद्धूंची वैद्यकीय स्थिती विचारात घेऊन न्यायालयानं त्यांना या आहाराची परवानगी दिली आहे.

सिद्धूंचा रोजचा आहार

सकाळी : बीट, दुधी भोपळा, काकडी, तुळस, पुदिना, आवळा, गाजरा अथवा कोरफड यापैकी एकाचा ग्लासभर ज्यूस

पर्यायी

एक फळ : कलिंगड, खरबूज, किवी, स्ट्रॉबेरी, पेरू, सफरचंद

काळा चना (25 ग्रॅम) आणि मूग डाळ (25 ग्रॅम) यासोबत काकडी, टोमॅटो, अॅव्होकॅडो यापैकी एक

दुपारचं जेवण : ज्वारी, शिंगाडा आणि नाचणी प्रत्येकी 30 ग्रॅम यांच्या पिठाची एक चपाती

हिरव्या पालेभाज्या आणि काकडी अथवा बीट रायता, ग्रीन सॅलड, अर्धे लिंबू, एक ग्लास लस्सी

संध्याकाळी : विनासाखर आणि लो फॅट दुधाचा 100 मिली चहा, 25 ग्रॅम पनीर अथवा टोफू आणि अर्धे लिंबू

रात्रीचं जेवण : हिरव्या पालेभाज्या, डाळ, सौते केलेल्या भाज्या

झोपताना : एक कप कॅमोमाईल चहा आणि एक चमता सिलियम हस्क अर्धा ग्लास गरम पाण्यासोबत

Navjot Singh Sidhu
माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा

या प्रकरणाची सुनावणी तीन दशकांहून अधिक काळ सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने सिध्दूंना एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ते काल (ता.२०) न्यायालयासमोर शरण येणार, अशी चर्चा होती. पण त्यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. आरोग्याच्या कारणांमुळे शरण येण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती. पीडितांच्या वकिलांनी मात्र त्यास विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयानं सिद्धूंच्या वकिलांना दुसऱ्या खंडपीठासमोर अर्ज करण्यास सांगितलं होतं. आता या अर्जावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यामुळं तातडीनं दिलासा न मिळाल्यानं सिद्धू हे अखेर पतियाळा न्यायालयासमोर शरण आले होते.

Navjot Singh Sidhu
असंही राजकारण! बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला राज्यसभेची जागा

सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पातियाळातील रहिवासी गुरनामसिंग यांच्याशी 1988 मध्ये भांडण झालं होत. पार्किंगच्या जागेवरून हा वाद झाला होता. सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदरसिंग संधू यांनी गुरनाम यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली होती. यात गुरनामचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर सिध्दू यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली होती. न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com