माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा

माजी मुख्यमंत्री 87 व्या वर्षी पुन्हा तुरुंगात जाण्याची शक्यता
Om Prakash Chautala
Om Prakash ChautalaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयानं (Court) माजी मुख्यमंत्र्यांना दणका दिला आहे. हरियानाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) प्रमुख ओमप्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. चौटाला यांचे वय 87 असून, त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे. याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) विरोध दर्शवला आहे. यावर न्यायालय उद्या (ता.27) फैसला सुनावणार आहे. (Om Prakash Chuatala News)

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालय आज ओमप्रकाश चौटाला यांना शिक्षा सुनावणार होते. या सुनावणीसाठी चौटाला हे न्यायालयात हजर होते. चौटाला यांच्या प्रकृतीचा विचार करून त्याना कमी शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडं केली. याला सीबीआयने आक्षेप घेतला. चौटाला यांनी कमीत कमी शिक्षा सुनावल्यास समजात चुकीचा संदेश जाईल. चौटाला हे नेते असून, त्यांना जास्त शिक्षा झाल्यास यातून समाजाला योग्य संदेश मिळेल. याआधी त्यांना शिक्षा झाली आहे, असा युक्तिवाद सीबीआयनं केला. न्यायालय उद्या चौटाला यांना शिक्षा सुनावणार आहे.

Om Prakash Chautala
असंही राजकारण! बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला राज्यसभेची जागा

शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौटाला यांनी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर गेल्या वर्षी चौटाला यांची सुटका झाली होती. शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौटाला यांची 2013 मध्ये तुरुंगात रवानगी झाली होती. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. चौटाला यांच्यासोबत त्यांचे पुत्र अजय चौटाला आणि इतर 53 जणांना 2000 मध्ये हरियाणातील 3 हजार 206 कनिष्ठ मूलभूत शिक्षकांच्या बेकायदा भरतीसाठी दोषी ठरवण्यात आल होतं. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जानेवारी 2013 मध्ये या सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Om Prakash Chautala
अखेर सिद्धूला कारागृहात काम मिळालं पण सुरक्षेच्या कारणास्तव 'वर्क फ्रॉम कोठडी'

ओमप्रकाश चौटाला हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी हरियाणा बोर्डातून दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी 2021 मध्ये हरियाना ओपन बोर्डमधून बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, तोपर्यंत ते दहावीच्या इंग्रजी विषयात उत्तीर्ण न झाल्यानं त्यांचा निकाल रोखण्यात आला होता. गेल्या वर्षी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये त्यांनी 100 पैकी 88 गुण मिळवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Jharkhand Protest  .jpg
Amit Malviya_BJP
Shehzad poonawalla
BJP Nitin Nabin New team:
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com