Congress News : भाजपचा टॅक्स टेररिझम... प्री-पेड, पोस्ट-पेड, पोस्ट-रेड!

Income Tax Notice : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला सुमारे 1 हजार 700 कोटींच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. यापूर्वीच विभागाने पक्षाची बँक खाती गोठवली आहेत.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला (Congress News) पुन्हा जोरदार दणका दिला आहे. पक्षाला 1 हजार 700 कोटींच्या वसुलीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. हा भाजपचा ‘टॅक्स टेररिझम’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्राप्तिकर विभागाने भाजपकडेही कराचा हिशाेब मागायला हवा, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि अजय माकन यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून (BJP) प्राप्तिकर कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हा गंभीर प्रकार आहे. या उल्लंघनापोटी विभागाने भाजपकडे 4 हजार 600 कोटींहून अधिक रकमेची मागणी करायला हवी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली.

BJP, Congress
Arvind Kejriwal News : केजरीवालांसाठी पत्नी मैदानात; व्हॉट्सअ‍ॅप नंबर सार्वजनिक केला अन् म्हणाल्या...

निवडणूक रोखे योजनेचा उल्लेख करत जयराम रमेश म्हणाले, भाजपने निवडणूक रोखे घोटाळ्यातून 8 हजार 200 कोटी रुपये गोळा केले. त्यासाठी प्री-प्रेड, पोस्ट-पेड, पोस्ट-रेड लाच आणि शेल कंपन्यांचा मार्ग अवलंबला. दुसरीकडे भाजप टॅक्स टेररिझममध्ये व्यस्त असल्याची आरोपही जयराम रमेश यांनी केला.

काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही झुकणार नाही. पक्षाचा आगामी निवडणुकीतील प्रचार सुरूच राहील. आम्ही पक्षाच्या गॅरंटी लोकांपर्यंत घेऊन जाऊ. अशा नोटीसला आम्ही घाबरत नाही. आम्ही अधिक आक्रमकपणे निवडणीकीत उतरू, असेही जयराम रमेश यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे प्रकरण?

प्राप्तिकर विभागाने (Income Tax) काँग्रेस पक्षाकडून करवसुलीबाबत सुरू केलेली प्रक्रिया थांबवावी, या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टात (High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका काल कोर्टाने फेटाळून लावली. त्यानंतर विभागाने लगेचच पक्षाला 1 हजार 700 कोटींच्या वसुलीची नोटीस पाठवली. ही वसुली 2017-18 आणि 2020-21 या दोन वर्षांतील आहे.

प्राप्तिकर विभागाने 2017 ते 2021 या चार वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. त्याविरोधात पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याआधी 2014-15 ते 2016-17 या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. त्यावेळी सुमारे दीडशे कोटींची वसुलीही करण्यात आली होती.

R

BJP, Congress
Rahul Gandhi News : महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण देणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com