New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) हे सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत आहे. कालच त्यांच्या कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षासमोर संकट उभे ठाकले आहे. निवडणुकीच्या प्रचारात केजरीवालांची जागा भरून काढण्यासाठी आता त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मैदानात उतरल्या आहेत. आज त्यांनी एका व्हिडिओच्या व्हॉट्सअॅप नंबर सार्वजनिक करत नागरिकांना आवाहन केले.
सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी आज ‘केजरीवालांना आशीर्वाद’ (Kejriwal ko Aashirvaad) या मोहिमेची घोषणा केली. त्यांनी एक व्हॉट्सअॅप नंबर (8297324624) जाहीर करत केजरीवालांच्या समर्थनासाठी संदेश पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या म्हणाल्या, व्हॉट्सअॅपवर आलेला प्रत्येक मेसेज मी केजरीवालापर्यंत पोहाेचवणार आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी या क्रमांकावर केजरीवालांसाठी संदेश पाठवावेत.
कोर्टामध्ये काल अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे जोरदार खंडन केले. त्यावर बोलताना सुनीता केजरीवाल म्हणाले, काल कोर्टात अरविंद केजरीवाल जे काही बोलले त्यासाठी खूप हिंमत लागते. ते सच्चे देशभक्त आहेत. याचप्रकारे आपले स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांशी लढले. मी 30 वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे. त्यांनी नेहमीच भ्रष्ट आणि हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे. या लढाईत तुम्ही साथ देणार नाही का?
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोर्टाने सुनीता केजरीवाल यांना पतीच्या भेटीसाठी ठराविक वेळ दिला आहे. त्यानुसार त्या दररोज ईडी (ED) कार्यालयात अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी जातात. आता मुख्यमंत्री जेलमध्ये असल्याने दिल्ली सरकारचे कामकाज ठप्प झाल्याचा आरोप भाजपकडून (BJP) केला जात आहे. तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री केजरीवाल जेलमधून आदेश देत असल्याचा दावा करत आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, काल अरविंद केजरीवाल यांनी कोर्टात (Delhi Liquor scam Case) आपली बाजू मांडली. त्यासाठी कोर्टानेही त्यांना परवानगी दिली होती. या वेळी त्यांनी थेट ईडीच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त जोरदार टीका केली. ईडीने तपास सुरू केल्यानंतरच हा घोटाळा सुरू झाला. माफीचा साक्षीदार केलेल्या व्यक्तीच्या सातपैकी केवळ एका जबाबात माझे नाव आहे. माझे नाव त्यात आल्यानंतर त्याला जामीन मिळाला, असा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.