Rahul Gandhi News : महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण देणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी यांच्याकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जातनिहाय जनगणना ही घोषणाही त्यापैकीच एक आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सत्ताधारी भाजप, काँग्रेससह इतर सर्वच पक्षांकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून बराच वादही निर्माण झाला. आता महिलांसाठी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यानंतर महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण दिले जाईल, असे राहुल यांनी सांगितले.

देशात महिला मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यांच्यासाठी सर्वच पक्षांकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, देशाचे भवितव्य बदलण्याची ताकद नारीशक्तीमध्ये आहे. देशात तीन महिलांमध्ये केवळ एका महिलेकडे रोजगार आहे, तर दहा सरकारी नोकऱ्यांपैकी केवळ एका जागेवर महिला का दिसते, असा सवालही त्यांनी केला.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘इंडिया’वर शिक्कामोर्तब; लालूंचाच दबदबा, कुणाला किती जागा?

देशात महिलांची लोकसंख्या जवळपास 50 टक्के आहे. शिक्षणात मुलींची संख्या 50 टक्के आहे. मग त्यांचा शासकीय यंत्रणेतील सहभाग का कमी आहे. त्यामुळे या अर्ध्या लोकसंख्येला पूर्ण हक्क मिळायला हवा, अशी काँग्रेसची (Congress) धारणा आहे. सरकारमध्ये महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाल्यास त्या त्यांच्यातील गुणवत्तेला पूर्णपणे न्याय देऊ शकतील, असे राहुल गांधी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिलांना संधी देण्यासाठी नवीन नोकऱ्यांमध्ये 50 टक्के जागा आरक्षित (Reservation) ठेवल्या जातील, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्याचपमाणे संसद आणि विधिमंडळातही महिलांना आरक्षणाची तातडीने अंमलबजावणीसाठी आमचा आग्रह राहील, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.

महिलांना नोकरीत 50 टक्के आरक्षण मिळाल्यास देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल. सक्षम झालेल्या महिलाच देशाचे भवितव्य बदलू शकतात, असे राहुल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, मागील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात महिला सक्षमीकरण, महिला सन्मान आदी मुद्दे चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

R

Rahul Gandhi
Arvind Kejriwal News : केजरीवालांसाठी पत्नी मैदानात; व्हॉट्सअ‍ॅप नंबर सार्वजनिक केला अन् म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com