One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'ला काँग्रेसचा विरोध, औवेसींची भूमिका काय?

Congress Opposition One Nation One Election : वन इलेक्शन ही व्यवस्था धोकादायक आहे. मुद्दे भरकटवण्यासाठी भाजप हा मुद्दे उचलत आहे. वन नेशन वन इलेक्शन ही व्यवस्था संविधानाच्या विरोधात आहे. हे व्यवहारीक नाही, असे खर्गे म्हणाले.
mallikarjun kharge  Asaduddin Owaisi
mallikarjun kharge Asaduddin Owaisisarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात अभ्यास करून हा प्रस्ताव राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्याकडे दिला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत कॅबिनेटच्या बैठकीत 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, काँग्रेसने 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हे चालणार नाही. लोकशाहीत एक देश एक निवडणूक हे लागू होऊ शकत नाही. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूका होणे गरजेचे आहे.

वन इलेक्शन ही व्यवस्था धोकादायक आहे. मुद्दे भरकटवण्यासाठी भाजप हा मुद्दे उचलत आहे. वन नेशन वन इलेक्शन ही व्यवस्था संविधानाच्या विरोधात आहे. हे व्यवहारीक नाही.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे पत्रक आपल्या ट्विटवरून शेअर करत वन इलेक्शनला विरोध केला.

mallikarjun kharge  Asaduddin Owaisi
Video One Nation One Election : अखेर ठरलं! एक देश एक निवडणूक होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध केला आहे. वन इलेक्शन संघराज्य नष्ट करते. एकापेक्षा जास्त वेळा निवडणुका होणे ही मोदी आणि शहा सोडून कोणाचीही समस्या नाही. केवळ मोदी-शहा यांना नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार करणे आवश्यक आहे, याचा अर्थ असा नाही की एकाचवेळी निवडणुका घ्याव्या लागतील.

62 पक्षांचे मत काय?

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वन इलेक्शनचा संदर्भात तब्बल 62 राजकीय पक्षांशी संपर्क साधला. यामध्ये 32 पक्षांनी पाठींबा दिला तर 15 पक्षांनी विरोध केला आहे. कोविंद यांनी वन इलेक्शन बाबत दिलेल्या अहवालाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

mallikarjun kharge  Asaduddin Owaisi
PM Modi and Vidhan Sabha Election: मोठी बातमी! पुण्यातून पंतप्रधान मोदी फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com