Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! राजीनामा दिलेल्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

MP Pradyut Bordoloi Joins BJP : काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
Pradyut Bordoloi Joins BJP
Pradyut Bordoloi Joins BJPsarkarnama
Published on
Updated on

Pradyut Bordoloi News : पाच राज्यातील निवडणुकांच्या तयारीत व्यग्र असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान खासदाराने मंगळवारी राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला 24 तासा होण्याच्या आधीच त्या खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला.

आसामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. 9 एप्रिलाल मतदान होणार आहे. मात्र, काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी समोर आली असून आपल्या पक्षात मानसन्मान मिळत नाही, असा आरोप करत खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी राजीनामा दिला. बोरदोलोई यांच्या खासदाराकीचा कार्यकाळ अजून तीन वर्ष बाकी असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजीनाम्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, आसामच्या राजकारणात बोरदोलोई हे काही नवे नाव नाही. त्यांच्या सारखा अनुभवी नेता भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

Pradyut Bordoloi Joins BJP
Congress News : बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लगेच राहुल गांधींचा फोन; मुख्यमंत्र्यांनी थेट घर गाठलं, भाजपमध्ये प्रवेश ठरला...

बोरदोलोई हे तरुण गोगाई हे मंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. त्यांचे पुत्राला काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी देखील दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. मुलगा देखील वडिलांसोबत भाजपमध्ये जाणार की नाही याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सगळे डाग धुलते जातील

आसामची जबाबादरी असलेले काँग्रेस नेते भुपेश बघेल यांनी बोरदोलोई यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना म्हटले की, आता त्यांच्यावरील सर्व डाग धुलते जातील. हेमंत बिस्वा जेंव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप होते. भाजपमध्ये जाताच त्यांचे डाग धुतले गेले. तसेच बोरदोलोई यांच्याबाबत आहे.

Pradyut Bordoloi Joins BJP
Congress Politics : मोठी बातमी! काँग्रेस खासदाराचा राजीनामा, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com