Benjamin Netanyahu News : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांना गोळीने उडवा ; काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान!

Benjamin Netanyahu News : हमासच्या समर्थनार्थ केरळमध्ये रॅली, काँग्रेस खासदार सहभागी..
Benjamin Netanyahu News :
Benjamin Netanyahu News :Sarkarnama
Published on
Updated on

Kerala News : केरळमधील काँग्रेस पक्षाचे खासदार राजमोहन उन्नीथन यांच्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यासंदर्भात बोलत असताना खासदार राजमोहन उन्नीथन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना युद्धासाठी जबाबदार धरले आहे. तसेच कोणतीही कायदेशीर कारवाई न करता नेत्यान्याहू यांना गोळ्या घालण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. यामुळे आता त्यांच्या वक्तव्याबद्दल उलट-सुलट चर्चा केली जात आहे. (Latest Marathi News)

Benjamin Netanyahu News :
NCP-BJP : राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातील समस्या सोडवली भाजपच्या माजी आमदाराने!

गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याकडून सुरू असलेल्या जमिनीवरील हल्ल्यादरम्यान पॅलेस्टाईनशी एकता दाखवण्यासाठी, केरळमधील कासारगोड येथे आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा केली जात आहे.

खासदार उन्नीथन म्हणाले, "तुम्ही विचारू शकता की, ज्यांनी जिनिव्हा करारांतर्गत सर्व करार मोडले त्यांचे काय केले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्ह्यातील दोषींना (नाझी) न्याय मिळवून देण्यासाठी न्युरेमबर्ग ट्रायल नावाची गोष्ट होती. खटला न चालवता गुन्ह्यांची अंमलबजावणी केली जात होती.आता वेळ आली आहे की, इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध न्युरेमबर्ग मॉडेल लागू केले गेले पाहिजे.आज बेंजामिन नेतान्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत.आता नेतन्याहू यांना गोळ्या घालून ठार मारण्याची वेळ आली आहे."

कासारगोड युनायटेड मुस्लीम संघटनांकडून शुक्रवारी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, खासदाराच्या अशा वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. काँग्रेस पक्षाची आपल्या खासदाराच्या अशा विधानांवर काय भूमिका आहे हे मला माहीत नाही. संसद सदस्य हे एक अतिशय जबाबदार पद आहे, ज्याकडे आंतरराष्ट्रीय समुदाय लक्ष देतो. एखादा खासदार अशी विधाने करतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

Benjamin Netanyahu News :
Israel-Hamas War : इस्राईलच्या पाठीशी अमेरिका, तर रशिया पोहाेचला गाझापट्टीत; महाशक्तींमध्ये 'शीतयुद्ध'

यावर केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले, “काँग्रेस कोणत्या दिशेने जात आहे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कासारगोडचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी कासारगोड येथे आयोजित हमास समर्थक रॅलीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना ठार मारण्याची मागणी केली आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com