Congress Politics : काँग्रेसचा मोठा निर्णय, माजी मुख्यमंत्र्याला हटवले, निवडणुकीच्याआधीच मोठे बदल

Sachin Pilot Bhupesh Baghel : काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. पंजाबची जबाबदारी भूपेंश बघेल यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसने संघटनात्मक बदल केले आहेत. आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्याआधी केलेले हे बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पंजाबमध्ये खासदार चरणजीत सिंह चेन्नी आणि प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह वडिंग यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल हे पंजाबचे प्रभारी होते. मात्र, त्यांना या दोन्ही गटांमध्ये समन्वय साधला आला नाही. आता काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल करताना त्यांना पंजाबच्या प्रभारीपदावरून हटवले आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे पंजाबची कमान देण्यात आली आहे.

पायलट हे आता पंजाबचे प्रभारी असणार आहेत. तर, भुपेश बघेल यांना आसामचे प्रभारी बनवण्यात आले आहे. संघटनात्मक बदलांमध्ये गुजराच्या महासचिवांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. गुजरातचे प्रभारीपद रणदीप सिंह सुरजेवाला यांना देण्यात आले असून कर्नाटकच्या प्रभारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Congress
Congress News: राहुल गांधींचा पुणे दौऱ्यानंतर पहिला मोठा धमाका; चेन्निथलांनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारीपदाचा 'चार्ज' दिग्गज नेत्याकडे

महाराष्ट्राची जबाबदारी कोणाकडे?

केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. ती आता बदलण्यात आली असून आंध्र प्रदेशमधील काँग्रेसमधील अनुभवी आणि मुत्सद्दी नेते असलेल्या डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती महाराष्ट्रप्रभारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे यापूर्वी झारखंडचे प्रभारी पद होते.

Congress
Rahul Gandhi: काँग्रेस नेत्यांचा पक्षाविरोधातच एल्गार! दिल्लीत करणार धरणं आंदोलन; राहुल गांधींवर केले आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com