Rahul Gandhi FIR Varanasi : संसदेतील आंदोलनानंतर राहुल गांधींसह तीन खासदारांविरोधात वाराणसीत एफआयआर; सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप

FIR lodged against Rahul Gandhi and two MPs over alleged remarks hurting religious sentiments during Parliament protest : साधू-संतांच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पप्पू यादव आणि अवधेश प्रसाद यांचाही समावेश, तपास सुरू
Rahul Gandhi FIR Varanasi
Rahul Gandhi FIR VaranasiSarkarnama
Published on
Updated on

Varanasi Police FIR Against Rahul Gandhi : संसदेतील आंदोलनादरम्यान सनातन धर्माचा अपमान केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत वाराणसी पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य दोन खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काशी परिमंडळाचे पोलिस उपायुक्त गौरव बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi), बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव आणि उत्तर प्रदेशातील फैजाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

संसदेतील आंदोलनादरम्यान या तिन्ही खासदारांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत काही साधू-संतांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी (Police) प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदवला.

Rahul Gandhi FIR Varanasi
Jaish-e-Mohammed Suspect : जैश संशयित हमीम मंडल प्रकरणात मोठी कारवाई; 'हनी-ट्रॅप नेटवर्क'च्या संशयावरून महिला साथीदार अटक

धार्मिक गुरू बालक दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संसदेत पप्पू यादव यांनी प्रभू श्रीराम आणि सनातन धर्माबाबत केलेले वक्तव्य अक्षम्य असल्याचा आरोप केला. "सनातन धर्माचा कोणताही अनुयायी हे कृत्य विसरू शकत नाही. या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत," असे त्यांनी म्हटले.

Rahul Gandhi FIR Varanasi
Modi Gen Z Video : 'फेसबुक मुख्यमंत्री' म्हणणारे आज इन्स्टाग्रामवर सक्रिय; मोदींच्या सलग 3 व्हिडिओंवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ आणि 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या विरोधात शुक्रवारी 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले होते. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.

या प्रकरणातील आरोपांवर संबंधित काँग्रेस आणि विरोधक नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पुढील तपास वाराणसी पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com