Jaish-e-Mohammed Suspect : जैश संशयित हमीम मंडल प्रकरणात मोठी कारवाई; 'हनी-ट्रॅप नेटवर्क'च्या संशयावरून महिला साथीदार अटक

STF probes alleged honey trap network linked to Jaish suspect : झारखंडमधून अर्पिता सरकारला ताब्यात; व्हॉट्सअ‍ॅप चॅट जप्त, राजकीय नेत्यांची संवेदनशील माहिती गोळा केल्याच्या संशयाचा तपास
Jaish-e-Mohammed Suspect
Jaish-e-Mohammed SuspectSarkarnama
Published on
Updated on

West Bengal STF arrests woman linked to Jaish suspect : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या मोहम्मद हमीम मंडल प्रकरणात मोठी कारवाई करत त्याची महिला साथीदार अर्पिता सरकार हिला अटक केली आहे.

झारखंडमधील साहेबगंज येथून शुक्रवारी तिला ताब्यात घेऊन वर्धमान येथे आणण्यात आले. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, अर्पिता सरकार कथित 'हनी-ट्रॅप नेटवर्क' चालवण्यात सक्रिय होती.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद हमीम मंडलने पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रभावशाली राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी अर्पिताचा वापर केल्याचा संशय आहे. मंडलला यापूर्वी वर्धमान शहरातील एका भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी (Police) मंडल आणि अर्पिता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट जप्त केले आहेत. या चॅटमधून दोघे नियमित संपर्कात असल्याचे समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्पिता ही केवळ ओळखीची नसून मंडलची जवळची सहकारी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

Jaish-e-Mohammed Suspect
Modi Gen Z Video : 'फेसबुक मुख्यमंत्री' म्हणणारे आज इन्स्टाग्रामवर सक्रिय; मोदींच्या सलग 3 व्हिडिओंवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

भाजप नेत्यांसह महत्त्वाच्या व्यक्ती टार्गेट

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद हमीम मंडल हा कथितपणे आयएसआय समर्थित नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्याच्यावर भाजप नेत्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती गोळा करणे, नवीन सदस्यांची भरती करणे आणि पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी कारवायांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Jaish-e-Mohammed Suspect
Ladki Bahin Scheme : 'ई-केवायसी'चे नाटक नको, 'लाडकी बहिणी' योजनेचा सरसकट लाभ द्या : NCP पदाधिकाऱ्यांचं साडी-चोळी घालून आंदोलन

स्वतंत्र नेटवर्क उभारण्याचा प्रकार

तपासात काही राजकीय व्यक्तींची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. ही माहिती संभाव्य हल्ल्यांच्या नियोजनासाठी वापरली जाणार होती का, याचा तपास सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हालचालींवर लक्ष

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, विशेष कृती दल आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे. प्राथमिक तपासात मोहम्मद हमीम मंडल हा सुवेंदु अधिकारी यांच्या हालचाली, सार्वजनिक कार्यक्रम आणि त्यांच्या ताफ्याच्या मार्गांवर लक्ष ठेवत असल्याची बाबही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

तपास अजूनही सुरू

या प्रकरणातील डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क जाळे आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय दुव्यांची चौकशी सुरू असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com