

राजधानी दिल्लीत 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपचे स्वतंत्र मोर्चे निघणार आहेत. मतदारयादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रिया आणि ‘मतचोरी’च्या आरोपांवरून इंडिया आघाडीने रामलीला मैदानावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे भाजपनेही स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यामुळे रविवारी दिल्लीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचा ‘चलो दिल्ली’ मोर्चा काढण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजता मिंटो रोड आणि कनॉट प्लेस जंक्शन येथून या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा रामलीला मैदानावर पोहोचणार असून, तेथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची जाहीर सभा होणार आहे.
या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, मतदारयादीतील कथित गैरप्रकार आणि SIR प्रक्रियेला विरोध असे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांचा मुद्दाही इंडिया आघाडी मांडणार आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने 1 नोव्हेंबरला पश्चिम दिल्लीतील तिलक नगर ते हरिनगरदरम्यान मोर्चाचे आयोजन केले आहे. भाजप आणि शिख समुदायाकडून तसेच १९८४ च्या दंगल पीडितांच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील तिलक नगर ते हरी नगर दरम्यान विरोध मार्च काढण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, मूक आणि विरोध मार्चमध्ये ५००० हून अधिक नागरिक तसेच हरदीप पुरी यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.