

Congress News : तब्बल 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले आहे. सरकारने आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन आता थांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, काॅक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी या चर्चांना पूर्ण विराम देत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ करत परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची घोषणा केली. त्यावर काँग्रेसने धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीजी संसद सुरू असताना तुम्ही निवेदन द्यायला हवे, मध्यरात्री व्हिडिओ करून एकतर्फी मन की बात करू नका.
जोपर्यंत धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही आणि तुम्ही विद्यार्थ्यांची माफी माग तरच आम्ही संसदेत चर्चा करू, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
मागील चार दिवसांपासून विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कामकाज चालू दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ करत परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी नवीन विधेयक आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नीट पेपर लीक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आज संसदेचे कामकाज आज तरी सुरळीत पार पडेल, पेपर फुटीबाबत संसदेत चर्चा होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय संसदेत चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
दीपके यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचे समर्थन केले आहे. मात्र, धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन जंतर मंतरवर शांतीपूर्ण पद्धतीने सुरूच राहील, असे जाहीर केले आहे.
सोनम वांगचुक यांना दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नाही. मात्र, पेपर फुटीबाबत तसेच परीक्षा प्रणाली संसदेत चर्चा करण्याचे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार नसल्याचे आश्वासन सरकारने वांगचुक यांना दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.