Revanth Reddy: काँग्रेसच्या 'सीएम'ची मोदींकडे मोठी मागणी; म्हणाले,आता चर्चा-करार काही नको, थेट पाकिस्तानचे दोन तुकडे...

CM Revanth Reddy On Pahalgam Terror Attack : आता कोणतीही चर्चा,करार करण्याची वेळ नाही. त्यांना जोरदार प्रत्युत्तर द्या अशी मागणीही मुख्यमंत्री रेड्डी यांनी करतानाच पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलावीत, असं आवाहनही त्यांनी पंतप्रधान मोदींना यावेळी केले.
PM Narednra Modi, Revanth Reddy
PM Narednra Modi, Revanth ReddySarkarnama
Published on
Updated on

Hyadrabad News : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(ता.22 एप्रिल)भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.एकीकडे भारतानं या हल्ल्यानंतर कठोर पावलं उचलल्यानंतर दुसरीकडे सर्वपक्षीय बैठकीत सरकारची पुढची भूमिका स्पष्ट केली. यावेळी दहशतवादाविरोधात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारसोबत असल्याची ग्वाही दिली. आता काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) पंतप्रधान मोदींना सल्ला देतानाच थेट पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्लीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात काँग्रेसकडून दिल्लीसह त्यांचे सरकार असलेल्या राज्यात शुक्रवारी (ता.25) कँडल मार्च काढण्यात आले. यावेळी हैदराबादमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी,काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभागी घेतला. या कँडल मार्चमध्ये केंद्र सरकार दहशतवादी हल्ल्याबाबत जी काही कारवाई करेल किंवा जो काही निर्णय घेईल,त्यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्विट केलं आहे.त्यात त्यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना करारा जबाब देण्याचे आवाहन केलं आहे. पण यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका आणि आक्रमक भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

PM Narednra Modi, Revanth Reddy
Ram Shinde felicitation : राम शिंदेंच्या सभापतीपदाला कुणा कुणाचा होता विरोध? बावनकुळे म्हणतात, माझ्याकडे यादीच...

रेड्डी म्हणाले, पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करा.पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या, असेही रेड्डी म्हणाले. पहलगामसारख्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1971 मध्ये बांग्लादेश निर्मिती केल्यानंतर इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा म्हणून केली होती,असल्याचंही रेड्डी यांनी यावेळी सांगितलं.

रेड्डी म्हणाले,पाकिस्तानचे दोन तुकडे करा.पीओकेचा भारतात समावेश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत,असे त्यांनी जाहीर केले. तुम्ही दुर्गा मातेचे भक्त आहात. इंदिरा गांधी यांना आठवा आणि पाकिस्तानविरोधात कारवाई करावी असा सल्लाही पंतप्रधान मोदींना दिला आहे.

PM Narednra Modi, Revanth Reddy
Nishikant Dubey : पाकिस्तानचा राग अळवणाऱ्या बांगलादेशाची वळवळ थांबवण्याची हिच वेळ; दुबेंनी गंगेच्या पाण्याकडे लक्ष वेधलं

आता कोणतीही चर्चा,करार करण्याची वेळ नाही. त्यांना जोरदार प्रत्युत्तर द्या अशी मागणीही मुख्यमंत्री रेड्डी यांनी करतानाच पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलावीत, असं आवाहनही त्यांनी पंतप्रधान मोदींना यावेळी केले.

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले..?

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रहितासाठी आमचा पक्ष सरकारच्या पाठीशी असून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करा आणि दहशतवाद्यांना कडक शिक्षा करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचंही ओवैसी यांनी यावेळी म्हटलं. पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कडक शिक्षा देण्याची मागणीही केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com