Karnataka Politics : राज्यपाल-सिद्धरामय्या वाद पेटला; काँग्रेस थावरचंद गेहलोत यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार

Siddaramaiah Meet Congress High Command : म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातील भूखंड वाटप प्रकरणी राज्यपाल गेहलोत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे कर्नाटकात राजकारण पेटले आहे.
Siddaramaiah-Thawarchand Gehlot
Siddaramaiah-Thawarchand GehlotSarkarnama
Published on
Updated on

Bangalore, 24 August : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या विरोधात भूखंड वाटप प्रकरणी खटला चालवण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी परवानगी दिल्याने प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिल्लीत जाऊन त्यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली असून काँग्रेस अध्यक्षांसह हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.

तसेच, कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातील भूखंड वाटप प्रकरणी राज्यपाल गेहलोत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे कर्नाटकात राजकारण पेटले आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद रंगला आहे. एकीकडे राज्यपालांनी विरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेसचे कर्नाटकाचे (Karnataka) मुख्यमंत्री सिद्धरामय्याही चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (Dk Shivkumar) यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालविण्यास राज्यपालांनी परवानी देणे, यामागील कारस्थानाची त्यांनी काँग्रेस हायकमांडला माहिती दिली आहे. भाजपचा कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न, म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातील भूखंड वाटप याबाबतची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडला दिली आहे.

सिद्धरामय्या यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. खटल्याबाबत कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा सल्लाही काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना दिला आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारही होते.

Siddaramaiah-Thawarchand Gehlot
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांचे वाढले टेन्शन; कट्टर समर्थक माजी नगराध्यक्षाने घेतली जयंत पाटलांची भेट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल या सर्व नेत्यांची भेट घेऊन राजकीय घडामोडींची माहिती दिली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्नांविरोधात पक्षाच्या १३६ आमदारांना दिल्लीत आणून राष्ट्रपतींसमोर परेड करण्याच्या संदर्भातही सिद्धरामय्या यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच राज्यपाल गेहलोत यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात येईल. त्यांना परत बोलावण्याची राष्ट्रपतींना विनंती करण्यात येईल. सर्व आमदारांची राष्ट्रपतीसमोर परेड करण्याबाबतची चर्चाही पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली तर सर्व आमदारांना दिल्लीत आणून राष्ट्रपतींसमोर परेड करण्याची तयारीही सिद्धरामय्या यांनी दाखवली.

Siddaramaiah-Thawarchand Gehlot
Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान; ‘कदाचित दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळेल; पण...’

दरम्यान, न्यायालयाचा निर्णय पाहून खटल्याबाबत पुढचे पाऊल टाकण्यात येईल. पुढील सर्व काही न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे ठरवूयात, असे पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com