Sharad Pawar In Opposition Meeting : बिगरभाजप राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कारस्थान; शरद पवारांनी भाजपला सुनावलं

Sharad Pawar In Joint Opposition Meet : पाटणा येथील बैठक देशात बदल घडवेल
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Patna Opposition Meeting : पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने भाजपविरोधकांची बैठकी पार पडली. या बैठकीसाठी देशातील १५ पक्षांच्या प्रमुख्यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट)चे प्रमुख उध्दव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Rahul Gandhi Opposition Meeting : देशासाठी बलिदान करण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधींचा निर्धार

या बैठकीत देशातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. त्यातून देशभर दंगली पेटत असल्याचा आरोपही करण्यात आला. हे थांबवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत सर्व भाजप विरोधक नेत्यांनी व्यक्त केले. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथे दंगली घडवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा सांधला.

शरद पवार म्हणाले, देशात एक मोठी समस्या निर्माण होत आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यात भाजप आणि आरएसएस धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कारस्थान रचत आहे. देशातील एकता कशी नष्ट होईल, यासाठी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष प्रयत्न करतात. देशातील ही स्थिती बदलण्यासाठी भाजपविरोधात उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आमच्यातील काही मतभेद असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे जाणार आहोत."

Sharad Pawar
Uddhav Thackeray In Opposition Meeting : देशद्रोही, हुकुमशाहांसाठी मी विरोधकच; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर निशाणा

पवार यांनी पाटणा येथील बैठक देशात बदल घडवेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. पवार म्हणाले, "पाटणा येथून जयप्रकाश यांच्या नेतृत्वात एक संदेश देण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण बदलेले होते. देशातील अनेक आंदोलनांची सुरुवात येथूनच झाली. त्यानंतर त्यांचा देशात स्वीकार केला गेला. या बैठकीतही अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. यानंतर शिमला येथील बैठकीत काही निर्णय घेतले जातील. आज सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरवले आहे. त्याचा देशातील जनता स्वीकार करेल, यावर माझा विश्वास आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.