Uddhav Thackeray In Opposition Meeting : देशद्रोही, हुकुमशाहांसाठी मी विरोधकच; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर निशाणा

Uddhav Thackeray In Joint Opposition Meet : भाजपविरोधकांची ठरली रणनीती
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Patna Opposition Meeting : पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने भाजपविरोधकांची बैठकी पार पडली. या बैठकीसाठी देशातील १५ पक्षांच्या प्रमुख्यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट)चे प्रमुख उध्दव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Bihar Opposition Meet: भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची रणनीती ठरली; आजच्या बैठकीत काय ठरलं? नितीश कुमारांनी सांगितलं

या बैठकीत देशातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. त्यातून देशभर दंगली पेटत असल्याचा आरोपही करण्यात आला. हे थांबवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत सर्व भाजप विरोधक नेत्यांनी व्यक्त केले. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर हुकूमशाहा म्हणत टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे आहोत आमची विचारधाराही वेगळी आहे. मात्र देशाची एकी, देशाची अंखंडता कायम राखणे ही आताची मोठी गरज निर्माण झाली आहे. भाजपच्या धोरणांविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही स्वतःला विरोधक मानतच नाही. मात्र देशद्रोही आणि हुकुमशाहांसाठी आम्ही विरोधक आहोत."

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Speech: पाटण्यात बैठक सुरु असताना महाराष्ट्रात लालू-मुलायमसिंहांवर टिका करणारा बाळासाहेबांचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी विरोधकांची पुढील रणनीतीही ठरली आहे. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माहिती दिली .नितीश कुमार म्हणाले, "आजच्या विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे. आता पुढील बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शिमल्यात होणार आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपांबाबतची चर्चा पुढच्या बैठकीत होणार आहे. त्याबरोबरच 'किमान समान कार्यक्रम' सध्या आम्ही तयार करत आहोत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.