केंद्रीय मंत्र्यांच्या नृत्याची पंतप्रधान मोदींनाही भूरळ

नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Kiran Rijiju
Kiran Rijiju

नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ते एका लोकगीतावर नृत्य करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या नृत्याची भूरळ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पडली आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत 'डिसेंट डान्सर' असा त्यांचा उल्लेख केला आहे.

रिजिजू यांचा हा व्हिडीओ अरूणाचल प्रदेशातील सुंदर काजलंग गावांतील आहे. तिथे विवेकानंद केंद्र विद्यालय योजनेचा आढावा घेण्यासाटी ते गेले होते. यावेळी स्थानिक लोकांसोबत त्यांनी लोकगीतावर नृत्य करण्याचा आनंद लुटला. हेच नृत्य आता व्हायरल झाले आहे. रिजिजू यांनी या नृत्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून त्यामागची गोष्ट सांगितली आहे.

Kiran Rijiju
कट्टर विरोधक दिग्विजयसिंहांच्या मदतीसाठी अमित शहाही धावले!

त्यांनी म्हटले आहे की, 'हा नजारा सुंदर काजलंग गावचा आहे. सजोलँग लोकांची ही मनोरंजन करण्याची पारंपरिक पध्दत आहे. याप्रकारचे नृत्य अरूणाचल प्रदेशातील प्रत्येक समुदायासाठी खूप महत्वाचे मानले जाते.' व्हिडीओमध्ये इतर लोकही रिजिजू यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहे. पण पंतप्रधान मोदी यांना रिजिजू यांचं नृत्यू आवडलं आहे.

मोदी यांनी रिजिजू यांचा व्हिडीओ शेअर करून रिजिजू हे 'डिसेन्ट डान्सर' असल्याचं म्हटलं आहे. अरूणाचल प्रदेशमधील ही संस्कृती पाहून खूप आनंद वाटल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com