महिला पोलिसाशी गैरवर्तन भोवलं; काँग्रेस आमदाराला न्यायालयाचा दणका

महिला पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आमदारावर आरोप
Jignesh Mevani
Jignesh Mevani Sarkarnama
Published on
Updated on

गुवाहाटी : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांना न्यायालयानं काल (ता.25) दिलासा दिला होता. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर लगेचच मेवानी यांना पुन्हा अटक कऱण्यात आली आहे. पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आसाम पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं आता मेवानींना दणका दिला असून, त्यांची रवानगी पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली आहे.

वडगाममधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये मेवानी यांना 21 एप्रिलला आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्या रात्रीच त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले होते. मेवानी यांना काल जामीन मिळाल्यानंतर लगेचच त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. यानंतर त्यांनी भाजपला मै झुकेगा नही, असा थेट पुष्पास्टाईल इशारा दिला आहे. मेवानी यांची न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. याचबरोबर त्यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे.

Jignesh Mevani
आव्हाडांना मोठा दिलासा! सीबीआयकडे तपास देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप (BJP) नेत्यानं मेवानी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. धार्मिक भावना दुखावना, धार्मिक तेढ निर्माण करणे, असे आरोप मेवानी यांच्यावर करण्यात आले आहेत. आसाममध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासांतच मेवानी यांना अटक झाली होती. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला होता. अखेर या प्रकरणी न्यायालयानं मेवानी यांना जामीन मंजूर केला होता. आता ते दुसऱ्या गुन्ह्यात अडकले आहेत.

Jignesh Mevani
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी कोण देणार? गृहमंत्री वळसे पाटलांनी नावच सांगितलं

या प्रकरणी मेवानी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट होता. माझी प्रतिमा मलिन करण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे. ते पद्धतशीरपणे यासाठी पावले उचलत आहेत. आधी त्यांनी रोहित वेमुलाच्या बाबतीत हेच केलं होतं. नंतर चंद्रशेखर आझाद आणि माझ्याबाबतही हेच घडतं आहे. पंतप्रधान कार्यालयातून सुडाचं राजकारण सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com