तुम्ही कोव्हिशिल्ड घेतलीय? अभ्यासातून समोर आली दिलासादायक बाब

कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी आता दिलासादायक बाब समोर आली आहे.
Covid Vaccine
Covid VaccineSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यातच आता ओमिक्रॉनचा धोका जाणवू लागला आहे. मात्र, कोव्हिशिल्ड (Covishield) लस घेतलेल्या नागरिकांसाठी आता दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेतही या लशीची परिणामकारता अधिक होती, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.

'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस जर्नल' या संशोधनपत्रिकेत हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. भारतात एप्रिल ते मे या कालावधीत कोव्हिशिल्ड लशीची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्यात आली. याचवेळी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू होता. कोरोना विषाणूचा डेल्टा हा प्रकार त्यावेळी मोठ्या प्रमाणात संसर्गास कारणीभूत ठरत होता. त्यावेळी देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता.

दुसऱ्या लाटेतही कोव्हिशिल्ड लशीमुळे संसर्गापासून संरक्षण मिळत होते. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये या लशीची परिणामकारकता 63 टक्के आढळली आहे. मध्यम ते तीव्र संसर्गाच्या काळात लशीची परिणामकारकता सुरवातीला 81 टक्के आढळली होती. यामुळे कोव्हिशिल्ड लस ही नागरिकांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवून देत असल्याचे समोर आले आहे. आता कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनचा धोका जभभरात वाढू लागला असतानाही कोव्हिशिल्डपासून संरक्षण मिळते का, हे पाहावे लागणार आहे.

Covid Vaccine
सरकारी गाडीचा वापर परमबीरसिंहांना पडणार चांगलाच महागात!

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

Covid Vaccine
परमबीरसिंह-वाझेची गुप्त भेट अन् उपनिरीक्षकासह चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com