INDIA Alliance: मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा; 'इंडिया' आघाडी पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिवेशनासाठीची रणनीती ठरली?

Parliament Session 2025 : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलैपासून सुरू होत असून ते 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. त्यातच घटक पक्षांच्या परस्पर विरोधी वक्तव्य,भूमिकांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) एकोप्याला नेहमीच अडचणीत आणणारे ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले. अशातच आता देशाच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला अडचणीत आणण्यासाठीची रणनीती आखण्याच्या उद्देशानं इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक शनिवारी (ता. 19) पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या इंडिया आघाडीच्या बैठकीला 24 वेगवेगळ्या विरोधी पक्ष उपस्थित होते.

यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी, बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांसह विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भातील सरकारला जाब विचारण्यासाठीच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली.

इंडिया आघाडी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारसमोर आठ प्रमुख मुद्दे उपस्थित करत हल्लाबोल करणार असल्याची तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

India Alliance
Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करावा, मुंबई पोलिसांनी तातडीनं त्यांना...'; सदावर्तेंची खळबळजनक मागणी

त्यात एसआयआर मतदानावर बंदी,अहमदाबाद विमान अपघात, दलित,अल्पसंख्याकांसह महिलांवरील अत्याचार,ऑपरेशन सिंदूर,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धबंदीबाबतची भूमिका,पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील फरार आरोपी, ऑपरेशन सिंदूर या प्रमुख मुद्द्यांभोवती मोदी सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलैपासून सुरू होत असून ते 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.

India Alliance
Rahul Gandhi: "मेक इन इंडियाच्या नावाखाली 'रिलायन्स ऑन चायना'चा उद्योग सुरु"; आखों देखा हाल म्हणत राहुल गांधींचे गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांच्या राजकीय वादंग निर्माण करणाऱ्या विधानानं राजकारण चांगलंच पेटलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे 'इंडिया' आघाडीच्या एकसंधतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दिल्लीतील 'Contesting Democratic Deficit' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना, त्यांनी आघाडीच्या सद्यस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली होती.

तर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीपूर्वी इंडिया आघाडीची बैठक व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता इंडिया आघाडीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. तसेच लवकरच इंडिया आघाडीची ऑफलाईन बैठक बोलावली जाणार असल्याचेही माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com